शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

गृहपोलीस उपअधीक्षक सतीश माने राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 5:51 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा गृहपोलीस उपअधीक्षक सतीश बाळासाहेब माने व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक फौजदार मनोहर बसाप्पा खणगावकर ठरले. शनिवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पदके जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देगृहपोलीस उपअधीक्षक सतीश माने राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरीसहायक फौजदार मनोहर खणगावकर मानकरी

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा गृहपोलीस उपअधीक्षक सतीश बाळासाहेब माने व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक फौजदार मनोहर बसाप्पा खणगावकर ठरले. शनिवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पदके जाहीर करण्यात आली.पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) व स्वातंत्र्यदिनाच्या (१५ आॅगस्ट) पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले जाते. सतीश माने हे मूळचे कागलचे. १९८३ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी आजअखेर सोलापूर (ग्रामीण), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली, सोलापूर शहर, सिंधुदुर्ग, पुणे रेल्वे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग कोल्हापूर, औरंगाबाद (ग्रामीण), उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड येथे सेवा बजावली आहे.

सध्या गृहपोलीस उपअधीक्षक (कोल्हापूर मुख्यालय) येथे आॅगस्ट २०१६ पासून कार्यरत आहेत. चार महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाची व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल २२४ बक्षिसे व प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. २०११ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक, मुंबई यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

सहायक फौजदार खणगावकर यांचे मूळ गाव तारेवाडी (ता. गडहिंग्लज). अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून श्क्षिण घेत १९८४ मध्ये मुंबई रेल्वे पोलीस दलात बांद्रा येथे रुजू झाले. बदली झाल्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, गडहिंग्लज, हलकर्णी, चंदगड, कोवाड, आजरा, उत्तूर येथे सेवा बजावली. उत्तूर येथे असताना २००२ मध्ये चिमणे (ता. आजरा) येथील बहुचर्चित आजगेकर बंधू खून प्रकरणातील पाचही आरोपींना पकडण्याची कामगिरी केली.

रायटर म्हणून तपासणी कागदपत्रे तयार केली. यामुळे पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. कोवाड येथे सेवा बजावत असताना राजगोळी येथील प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह बॅरेलमध्ये तीन महिने लपवून ठेवला होता. या खळबळजनक घटनेतील मुख आरोपी व त्याचे साथीदार पकडण्याची कामगिरी केली.

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथे सेवेत असताना अशोक धिवरे यांनी त्यांना दोन वेळा अतिउत्कृ ष्ट सेवेचा शेरा देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागात सेवा बजावत असताना १०० हून अधिक भ्रष्टाचारी लोकांना पकडणेकामी त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

या कामगिरीसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, शिरीष सरदेशपांडे, सारंग आवाड, संदीप दिवाण यांनी त्यांच्या कामगिरीसाठी उत्कृ ष्ट शेरा देऊन गौरविले आहे. त्यांच्या पोलीस सेवेतील जनसंपर्कामुळे चोरी, घरफोडी, खुनाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांनी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अत्यंत महत्त्वाची व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल १२५ बक्षिसे व प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. २०१८ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक, मुंबई यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.फोटो : २५०१२०१९-कोल-सतीश मानेफोटो : २५०१२०१९-कोल-मनोहर खणगावकर----------------------------

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर