शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

पंतप्रधान आवास योजनेतून कामगारांना घरकुले द्यावीत

By admin | Published: January 24, 2017 12:18 AM

इचलकरंजीत मागणी : कामगार संघटनेने प्रस्ताव देण्याच्या नगराध्यक्षांकडून सूचना

इचलकरंजी : शहर व परिसरात यंत्रमाग उद्योगात असलेल्या कामगारांसाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे घरकुल योजना राबविण्यात यावी, अशी मागणी करवीर कामगार संघ-आयटक या संघटनेच्यावतीने नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी पंतप्रधान आवास योजनेतून कामगारांना घरे मिळावीत, अशा आशयाचा प्रस्ताव कामगार संघटनेने द्यावा, असे सूचित केले.करवीर कामगार संघटनेच्यावतीने यंत्रमाग उद्योगातील कामगारांचा मोर्चा नगरपालिकेवर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष मारुती आजगेकर व सचिव हणमंत लोहार यांनी केले. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चा नगरपालिकेवर आल्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आला. नगराध्यक्षा स्वामी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी यंत्रमाग कामगारांच्या घरकुल योजनेबाबत माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष आजरेकर म्हणाले, शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने २ जानेवारी २०१२ रोजी केलेल्या शासन निर्णयात यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्याचे घोषित केले आहे. या योजनेचा फायदा यंत्रमाग कामगार, जॉबर, दिवाणजी, कांडीवाला, सायझर, वार्पर, हेल्पर, फायरमन, वहिफणी कामगार, गारमेंट कामगार, वायडिंग कामगार, प्रोसेसर्स कामगार, घडीवाला, आॅटोलूम कामगार, आदींना मिळण्यासाठी नगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. शासनाकडून मंजूर होऊन आलेल्या प्रस्तावानुसार यंत्रमाग कामगारांना घरकुले बांधून द्यावीत.यानंतर नगराध्यक्षा स्वामी यांनी कामगारांना लवकरात लवकर घरकुले मिळण्यासाठी कामगार संघटनेने पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधून देण्याचा प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवून तो पुढे शासनाकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, नगरसेवक युवराज माळी, सागर चाळके, कामगार संघटनेचे महेश लोहार, शंकर आढावकर, वहिदा मुजावर, समीना गरगरे, नजमा दुरूगवाले, अशोक गोपलकर, रामचंद्र सौंदत्ते, ज्ञानदेव महादर, दादासाहेब जगदाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)