शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

हनीट्रॅप : चॅटिंग, मीटिंगनंतर लुबाडणुकीचे 'सेटिंग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 11:16 AM

तानाजी पोवार कोल्हापूर : पैसेवाल्या तरुणांना हेरुन मोबाईलवर चॅटिंगनंतर संपर्क, जवळीक अन त्या तरुणीच्या संपर्कातील सराईत टोळींकडून व्यावसायिकाला गाठून ...

तानाजी पोवारकोल्हापूर : पैसेवाल्या तरुणांना हेरुन मोबाईलवर चॅटिंगनंतर संपर्क, जवळीक अन त्या तरुणीच्या संपर्कातील सराईत टोळींकडून व्यावसायिकाला गाठून बदनामी थांवविण्याच्या बदल्यात होणारी आर्थिक लुबाडणूक. हेच ‘हनीट्रॅप’चे तंत्र अवलंबून कोल्हापूर शहरात सद्या गुन्हेगारांच्या तीन टोळ्या सक्रीय असून जिल्ह्यात सुमारे सहा टोळ्यांमार्फत बडे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, कापड व्यापारी, मसाला व्यापारी, कारखानदार यांना ‘ट्रॅप’ केल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत पुढे आली. गुंडांनी अनेक व्यावसायिकांची करोडो रुपयांची पिळवणूक झाल्याचे समोर आले, पण तक्रारीसाठी कोणीही पुढे नसल्याचे प्राथमिक चित्र आहे.

महिन्यापूर्वी यड्राव, शाहूनगर येथे हनीट्रॅपच्या घटना घडल्या, पण त्याबाबत पोलीस खात्याला त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. पण आठवड्यापूर्वी कोल्हापूरच्या साखर व्यापा-याला मुंबईत हनीट्रॅप केल्याचे उघड झाल्याने या लुबाडणुकीला वाचा फुटली, अन् पाठोपाठ कोल्हापूर शहरात कापड व्यापा-याला अडीच लाखाचा चूना लावत ‘हनीट्रॅप’ केल्याचे उघड झाले. त्यातून सहा गुन्हेगार गजाआड घातले अन पोलिसांची यंत्रणा कामाला लागली. प्राथमिक तपासात गुन्हेगारांच्या तीन टोळ्यांनी झटपट पैसे मिळवण्यासाठी शहरात ‘हनीट्रॅप’ करून अनेक व्यापा-याला लुबाडल्याची माहिती पुढे आली.

दोन महिलांचा समावेश

सद्या शहरातील तीन टोळींची माहिती पोलिसांच्या हाती लागली असली तरीही ‘हनीट्रॅप’साठी एक महिला व एका अल्पवयीन तरुणीचा वारंवार वापर केल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्या शोधासाठी पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

पेठातील तरुणांचा गुंडगिरीसाठी वापर

‘हनीट्रॅप’ करणा-या गुन्हेगारांच्या टोळीत कोल्हापूर शहरातील नामवंत पेठातील तसेच प्रमुख चौकातील काही तरुणांचा समावेश असल्याचेही तपासात पुढे आले. त्यातील काहींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

तंबाखू, मसाला व्यापारी टार्गेट

कोल्हापूर जिल्ह्यातील एक तंबाखू व्यापारी, मसाला व्यापारी ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून या गुंडांच्या टोळीने लाखो रुपये उकळले आहेत. काही व्यापा-यांची गेली दोन-अडीच वर्षे आर्थिक पिळवणूक होत आहे. पण बदनामी होण्याच्या भीतीने ते तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. पोलीस तक्रारदारांपर्यंत पोहचले, नावे गोपनीय ठेवण्याचाही शब्द दिला, तरीही तक्रारीसाठी फसलेले पुढे येत नसल्याची शोकांतिका आहे.

हिलस्टेशन, महामार्ग, फ्लॅटमध्ये लुबाडणूक

कोल्हापूर शहरापासून उत्तरेकडे अवघ्या २५ ते ३० किमी अंतरावरावर हिलस्टेशनमधील हॉटेलमध्ये, राष्ट्रीय महामार्गावर, एमआयडीसीतील कारखान्यात याशिवाय काही लॉज, हॉटेलसह खासगी फ्लॅटवरही बड्या व्यापार्यांना ‘हनीट्रॅप’ केल्याचेही चौकशीत आढळले.

तक्रार देण्यासाठी पुढे यावे यासाठी पोलीस फसलेल्यांच्या घरी चकरा मारत आहेत. अनेक फसलेल्या व्यापा-यांनी आपले फोन बंद ठेवले, त्यामुळे माहिती मिळूनही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.

२०१७ पासून ‘हनीट्रॅप’

सराईत गुंडाच्या टोळ्याकडून २०१७ पासून पोलिसांना गाफील ठेवून ‘हनीट्रॅप’ होत असल्याचे सत्य पोलिसांच्या चौकशीतच उघड झाले. पण फसलेल्या व्यापा-यांनी गुन्हेगारांच्या भीतीने तोंड बंद ठेवल्याने पोलीसही ‘हनीट्रॅप’ करणा-यांपासून दूरच राहिले. त्यामुळे अनेकजण बळी पडले आहेत. आताच या प्रकरणाला वाचा फुटल्याने गुन्हेगारांना शोधण्यासाठी, तसेच फसलेल्यांची तक्रार देण्यासाठी मानसिकता करण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhoneytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारी