शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 2:19 PM

''जिथे चिन्ह नाही, तिथे मोदी यांचा प्रचार''

इचलकरंजी : कोल्हापूर आणि सातारा या छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. समाजाने त्यांना सहकार्य केले पाहिजे. ज्याला पाडायचे आहे, त्याला इतक्या ताकदीने पाडा की पुढील पाच पिढ्या तो निवडणुकीस उभा राहता कामा नये, या शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत मराठा समाजाला आवाहन केले.जरांगे-पाटील म्हणाले, छत्रपतींच्या गादींचा सन्मान म्हणून त्यांना समाजाने सहकार्य केले पाहिजे. सहकार्य करायचे की नाही, हे समाजाच्या हातात आहे. ते त्यांनीच ठरवावे. त्यामध्ये भाजप अथवा महाविकास आघाडी याचा कोणताही संबंध नाही. संपूर्ण राज्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एका कोणत्याही उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. तसेच उमेदवार उभाही केलेला नाही. उभे राहण्यापेक्षा उमेदवार पाडण्यात लई मोठा विजय आहे. पाडण्याचेही मराठ्यांनी शिकले पाहिजे. ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडा. जशी मराठ्यांच्या एकीची भीती आहे, तशी मराठ्यांच्या मतांचीही भीती वाटली पाहिजे. पत्रकार परिषदेस शहाजी भोसले, संतोष सावंत, अरविंद माने, वैभव खोंद्रे, नितीन पाटील, प्रकाश बरकाळे उपस्थित होते.

जिथे चिन्ह नाही, तिथे मोदी यांचा प्रचारते म्हणाले, देशात पहिल्यांदा असे घडले आहे की, जिथे चिन्ह नाही, त्या मतदारसंघातही पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन दुसऱ्यांसाठी प्रचार करीत आहेत. त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्यावरही वेळ आणली. पंतप्रधान प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात येऊन सभा घेत आहेत. मराठ्यांच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे. राज्यात ४८ मतदारसंघ असतानाही पाच टप्प्यात मतदान घेतले. कारण, पंतप्रधान मोदी यांना प्रचाराला आणता यावे. छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे वाटोळे केले. त्यांना ओबीसी धनगर समाज यांचा प्रश्न सोडविता आलेला नाही...तर विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार देणारआम्हाला लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यास वेळ नव्हता. अचानक कोणाला तरी उभे करणे आणि मीच उभा केलेला समाज मातीत घालणे योग्य नाही. त्यामुळे निवडणूक लढविली नाही. मराठा कुणबी एकच असल्याचा सग्यासोयऱ्यांचा कायदा ६ जूननंतर सरकारने पारित केला नाही, तर मराठा विधानसभेच्या मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही. सर्व जाती-धर्माचे २८८ उमेदवार त्यावेळी उभे केले जातील, असे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले