लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवावर उदार होऊन समाजाच्या उन्नतीकरिता कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हीदेखील देशसेवा, असे प्रतिपादन भाजपचे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी व्यक्त केले. चाफोडी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात भाजप करवीर तालुकातर्फे आयोजित कोरोना योद्ध्याच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पंढरीनाथ भोपळे होते. यावेळी पोलीस पाटील, डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात पोलीस पाटील गजानन खोत, डॉ. मानसी पाटील, पंढरीनाथ भोपळे, भाजप युवा आघाडीचे अक्षय वरपे, आदींची भाषणे झाली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते संभाजी पाटील, राजाराम चव्हाण, सागर भोगम, सागर मोहिते, पोलीस पाटील सागर शिंदे, भगवान पाटील, संगीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.