शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

घोडेबाजारला लगाम घालू

By admin | Published: November 10, 2015 12:33 AM

मुश्रीफ, सतेज पाटील : विरोधकांनी मोठे मन दाखवून बिनविरोध निवड करावी

कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधकांनी नगरसेवकांत अस्थिरता पसरवू नये, तसेच मोठे मन दाखवून महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध करावी, असे माजी मंत्री सतेज पाटील यांनी आवाहन केले, तर महापौर निवडणुकीत विरोधकांनी घोडेबाजार सुरू केल्यास त्याला आम्ही लगाम घालू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांची बैठक सोमवारी रात्री येथील महालक्ष्मी लॉनवर झाली. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे प्रमुख उपस्थित होते. सतेज पाटील म्हणाले, विरोधी आघाडीला आव्हान देत आम्ही दोन्ही पक्षांनी ४४ हा बहुमतांचा आकडा गाठला आहे. दिवाळी तोंडावर असल्याने विरोधकांनी नगरसेवकांना भूलथापा लावून त्यांच्यात अस्थिरता निर्माण करू नये. काही शंका वाटल्यास नगरसेवकांनी नेत्यांना थेट फोन करावा. आज, मंगळवारी महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरू, सत्ता आपलीच आहे, मतदानदिवशी १६ नोव्हेंबरला सर्व नगरसेवकांनी कुठे एकत्र जमायचे हे नंतर ठरवू, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांची तत्त्वे एकच असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. महापौर निवडीवेळी पक्षाचा कोणीही नगरसेवक फुटणार नाही, फुटलाच तर त्याचे नगरसेवकपद जाणार आहे. तरीही कोणीही फुटणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शहरवासीयांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने कल दिला आहे. समविचारी पक्षाशी आघाडी केली आहे. महापौर निवडणुकीत दगा-फटका होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. पक्षाचा व्हीप बजावला जाणार आहे. घोडेबाजारला आपण लगाम घालण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, असेही ते म्हणाले.काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. सुरेश कऱ्हाडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी महापौर वैशाली डकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, सरचिटणीस प्रकाश सातपुते, आजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसच्या महिला शहरप्रमुख संध्या घोेटणे, भैया माने, आदी नेत्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, अपक्ष नगरसेवक राहुल माने, नीलोफर आजरेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)