राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उचल केलेल्या ‘खावटी’ कर्ज खात्यांची माहिती गोळा केल्याने जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘खावटी’मधील थकबाकीदारांना लाभ देणार की नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, याबाबत स्पष्टता नसली तरी माहिती संकलन पाहता थकबाकीदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. जून २०१६अखेर थकीत व याच थकबाकीची जुलै २०१७ पर्यंत परतफेड न केलेले ५७८९ शेतकरी आहेत. निकषाची चाळण लावल्यास यातील पाच हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे, तर याच वर्षात नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली. त्यानुसार गेले सव्वा वर्ष कर्जमाफीचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ९५ हजार शेतकºयांना ३९६ कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे.शेतकरी पीक कर्जाशिवाय स्वत:च्या क्षमतेवर विकास संस्था व जिल्हा बॅँकांकडून ‘खावटी’ कर्ज घेतो. नाबार्डच्या धोरणानुसार पीक कर्ज एकरी ३५ हजार आणि ‘खावटी’ १५ हजारांचे वाटप संस्था शेतकºयांना करतात. त्यातील ३५ हजारांचे कर्ज सवलतीच्या व्याजदरात, तर ‘खावटी’ १४ टक्के व्याजाने शेतकºयांना दिले जाते. सरकारने कर्जमाफीत केवळ पीक कर्जाचा समावेश केल्याने हजारो ‘खावटी’ कर्जदार कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते.या शेतकºयांनाही लाभ द्यावा, असा रेटा सरकारच्या पातळीवर होता. सरकारने ‘खावटी’ कर्जाची माहिती संकलन करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅँकेअंतर्गत ३१ मार्च २०१६अखेर ७५ हजार ५६४ शेतकºयांनी १८३ कोटी ९३ लाख ‘खावटी’ कर्जाची उचल केली आहे. त्यातील ३० जून २०१६अखेर ७६०० शेतकºयांचे १७.१६ कोटी थकीत राहिले आहे.कर्जमाफीच्या निकषानुसार जून २०१६अखेर थकीत कर्ज ते जुलै २०१७अखेर परतफेड न केल्यास त्याला लाभ दिला जातो. त्यानुसार ५७८९ शेतकºयांची १५.०८ कोटींची थकबाकी राहते. एकूण ‘खावटी’च्या थकबाकीदारांनाच माफी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने निकषाच्या चाळणीनंतर किमान पाच हजार शेतकºयांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.२०१६-१७ मध्ये २२० कोटींचे वाटपराज्य सरकारने २०१५-१६ या वर्षात वाटप केलेल्या ‘खावटी’ कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील माहितीही मागविली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७४ हजार शेतकºयांनी २२०.७२ कोटी कर्जाची उचल केली आहे.विकास संस्थांचे साडेपाच कोटी अडकलेपीक कर्जापेक्षा जादा व्याज मिळत असल्याने सक्षम विकास संस्था स्वनिधीतून ‘खावटी’चे वाटप करतात, पण हे थकीत गेल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. विकास संस्थांकडे स्वनिधीतून वाटप केलेले साडेपाच कोटी थकीत आहेत.
७५ हजार ‘खावटी’ कर्जदारांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:35 AM