हुपरी : हरिनामाच्या अखंड जयघोषात, मंगलमय पवित्र वातावरणाच्या सान्निध्यात हुपरी (ता. हातकणंगले) येथे गेल्या सात दिवसांपासून अखंडपणे सुरू असणाऱ्या ‘श्री ग्रंथराज पारायण महासोहळ्या’ची सांगता काल्याचे कीर्तन, महाप्रसाद व ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी उत्सवातील अश्वांच्या रिंगण सोहळ्याने शुक्रवारी करण्यात आली.या महापारायण सोहळ्यात सात दिवस हा नयनमनोहरी सोहळा पाहून उपस्थित हजारो भाविक भक्तिरसात अक्षरश: न्हावून गेले. दररोज १००८ जणांनी ग्रंथवाचनामध्ये सहभाग नोंदविला. रिंगण सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी अश्वांच्या पायाखालची धूळ भक्तिभावाने कपाळी लावून एकमेकांना अलिंगन दिले.
हुपरीत अश्वरिंगण सोहळा उत्साहात
By admin | Published: May 15, 2015 9:30 PM