शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

भुदरगड पंचायत समितीचे वरातीमागून घोडे

By admin | Published: October 14, 2015 11:50 PM

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ‘कागदी घोडे’ : पावसाळा संपल्यावर भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न

शिवाजी सावंत -- गारगोर्टी---पावसाळा संपल्यानंतर भूजल पातळी वाढविण्याकरिता उपाययोजना करणे म्हणजे, ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा कारभार पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करीत असून, केवळ कागदी घोडे नाचवून प्रत्यक्ष काम करण्याऐवजी काम करण्याचा देखावा करीत असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. खेड्या-पाड्यांतील लोकांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून शासनाने पंचायत समितीकडे स्वतंत्र पाणीपुरवठा विभाग निर्माण केला. या विभागाची जबाबदारी आहे की, लोकांना पुरेसे पाणी उपल्बधीच्या दृष्टीने उपाय योजना करणे. लोकांना आणि शासन दरबारी त्याचा अहवाल पाठवून नियोजन करणे; पण अलीकडच्या काळात या विभागातर्फे अनेक पेयजल योजना करण्यात आल्या. यातील काही ठरावीक योजना वगळता बहुतांशी योजनांचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत अनेक स्थानिकांच्या तक्रारी असतात; पण या शंकांचे निरसन कसे करायचे याबाबतीत हा विभाग कमालीचा तरबेज झाला आहे. भुदरगड तालुक्याला पाटगाव, चिकोत्रा, फये, कोंडुशी, मेघोली या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यासर्व जलाशयांची क्षमता एकत्रितरीत्या सात टी.एम. सी. होते. पण, चिकोत्रा धरण बांधल्यापासून केवळ एकदाच भरले आहे. आजअखेर हे धरण निम्मेच भरते. यंदातर हे धरण केवळ ४० टक्के भरले आहे. तालुक्यात सरासरी २००० मि. मी. पाऊस पडतो. पूर्व भागात कमी पडतो, तर पश्चिम भागात तीव्र स्वरूपात पडतो. पाटगाव, फये, कोंडुशी, मेघोली ही धरणे भरून साधारणत: ४ ते ५ टी.एम.सी. पाणी नदी, नाल्यांतून वाहून जाते. मात्त, येथे नियोजनाचा अभाव असल्याने या अमूल्य साधनसंपत्तीकडे कोणाचेही लक्ष नाही. म्हणून दुष्काळाची स्थिती निर्माण झाली की ‘माकडाच्या घराच्या’ गोष्टीची आठवण होते. नदीकाठालगतची गावे वगळता इतर सर्व गावे पिढ्यान्पिढ्या या नैसर्गिक जलस्त्रोतावर अवलंबून आहेत. आजअखेर या स्त्रोत्रातून केवळ उपसा केला गेला. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आणि याची इंत्यभूत तांत्रिक माहिती पाणीपुरवठा विभागाला असताना केवळ यंदा पाऊस कमी पडल्याने आढावा बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चेचे गुऱ्हाळ करीत आहेत. तालुक्यातील देवकेवाडा, बेडीव पैकी धनगरवाडी, फये, धनगरवाडा, पळशिवणे, ढाणेवाडी ही गावे तीव्र टंचाईग्रस्त आहेत. पण, या गावांतील झरे कदाचित अथवा विहिरींचे पावसाळ्यात पुनर्भरण झाले असते, तर कदाचित १५८ वाडी, वस्त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. नियोजनशुन्य कारभार आणि बेफिकीरपणा यामुळे ही गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. यंदा टँकरने काही गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. निसर्गाने पाण्याचा खजिना दिला आहे. त्याची योग्य आणि नियोजनपूर्वक हाताळणी केल्यास एकही गाव टंचाईग्रस्त राहणार नाही. ७२ गावांना नदीतून पाणीपुरवठा तालुक्यात दोनशे तीस वाड्या-वस्त्या आहेत. या वाड्या-वस्त्यांमध्ये एक लाख पन्नास हजार तिनशे लोक राहतात. या सर्वांना पाणीपुरवठा ७२ जॅकवेल, २९ पाणीपुरवठा विहिरी, ११० झरे, ८६ हातपंप, ०२ दुहेरी पंप, २८ विद्युत पंप, 0४ खासगी विहिरी, अशा ३३१ साधनांद्वारे केला जातो. यातील ७२ गावांना जवळपास नदीतून पाणीपुरवठा होतो. उर्वरित १५८ वाडी-वस्त्यांना झरे, विहिरी, आणि हातपंपावर अवलंबून राहावे लागते.