कोल्हापूर : मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात फ्लेम इन्स्टिट्यूटच्या संस्थापक-अध्यक्षा व आय. आय. एम., अहमदाबादच्या माजी अधिष्ठाता इंदिरा पारीख यांच्या हस्ते व्ही. ए. रायकर यांना प्रभावी संचालक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेस’ या नामवंत संस्थेकडून संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. व्ही. ए. रायकर यांचा भारतातील प्रभावी १०० संचालकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.या संस्थेकडून या पुरस्कारासाठी ‘स्ट्रॅटेजी परस्पेक्टिव्ह’, ‘इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘फ्युचर ओरिएंटेशन’, ‘ट्रॅक रेकॉर्ड’, ‘इंटिग्रिटी अॅँड इथिकस’, ‘अॅबिलिटी फॉर सस्टेनेबल एज्युकेशन’ व ‘इव्हॅल्युशन अॅप्रोच’ हे निकष लावूनच डॉ. रायकर यांची निवड करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी वर्ल्ड एचआरडी काँग्रेसचे चेअरमन हरीश मेहता, प्रा. टॉम हिल्टन, प्रा. वॉरेन, स्टार इंडस्ट्रीज गु्रपचे जोनाथन पीटर्स, वूडवर्ड असोसिएटच्या अध्यक्षा निना ई वूडवर्ड, डॉ. संजय मुथाळ, डॉ. सौगता मित्रा, आदींनी मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल घोडावत इन्स्टिट्यूटचे चेअरमन संजय घोडावत यांनी डॉ. रायकर यांचे अभिनंदन केले. भारतातील नामवंत संस्थांमध्ये निवडडॉ. रायकर यांनी आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. तसेच त्यांनी विविध फंडीज एजन्सीकडून २५ कोटी इतका निधी आणलेला आहे. यासह भारतातील नामवंत संस्था एआयसीटीई, एनबीए व यूजीसी अशा शैक्षणिक समितीवर सल्लागार व मूल्यमापन अधिकारी म्हणून काम केले आहे.
‘घोडावत’चे व्ही. ए. रायकर यांचा गौरव
By admin | Published: June 24, 2016 12:19 AM