शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

आकुर्डेमुळे अडले आघाड्यांचे घोडे !

By admin | Published: January 31, 2017 11:05 PM

भुदरगड तालुक्यातील स्थिती : नेत्यांच्या सोयीच्या आघाडीचे राजकारण मतदारांच्या पचनी पडणार का ?

शिवाजी सावंत--गारगोटी -भुदरगड तालुक्यातील राजकीय पक्षांत आघाड्या न झाल्याने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आघाड्या न होण्यात आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरत आहे. स्वतंत्र लढल्यास कोण किती पाण्यात आहे हे समजेल. समाधानकारक चर्चा न झाल्यास सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.काँग्रेसचे अंतर्गत गटबाजीने झालेले विभाजन, राष्ट्रवादीत झालेली फाटाफूट तर आमदार आबीटकर गटाची सुरू असलेली नव्याने बांधणी, भाजपच्या फोडाफोडी राजकारणात अजूनही हाताला एकही मोठा गट न लागल्याने कमी पडणारी ताकद या सर्व बाबींचा विचार करता विजयासाठी कोणत्याही पक्षाला आघाडी करण्याखेरीज दुसरा मार्ग नाही. आजच्या घडीला विजयासाठी आघाडी आवश्यक आहे.तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना! या स्थितीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत. हे सर्व राजकीय पक्ष प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या आघाड्या करतात. हे एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी निवडणुकीत एकत्र येऊन लढतात. मतदार स्वयंपूर्ण असल्यामुळे पक्षापेक्षा व्यक्तिसापेक्ष निवडणुका होत चालल्या आहेत. त्यामुळे पक्षाशी मतदारांची नाळ तुटत चालली आहे. राजकीय पक्षांची वैचारिक बैठक मतदारांना आकर्षित करण्यासाठी कमी पडत आहे. परिणामी मतदार आपल्या उपयोगी कोण आहे हे पाहून मतदान करीत आहेत. नेत्यांच्या सोयीच्या आघाडीचे राजकारण मतदारांच्या पचनी पडत नाही की काय ?तालुक्यात काँग्रेसचे प्राबल्य आहे परंतु दिवसेंदिवस अंतर्गत गटबाजीमुळे आज त्यांची तीन छकले पडली आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा गट आमदार आबीटकर यांच्यासोबत आहे. तर नव्याने उदयास आलेला आमदार सतेज पाटील यांच्या गटाची आघाडीचे सर्व निर्णय आमदार सतेज पाटील यांच्या मर्जीवर आहे. माजी आमदार बजरंग देसाई यांच्या गटाची एकाकी वाटचाल सुरू आहे. या तिन्ही गटांकडे निर्णायक ताकद असल्यामुळे राष्ट्रवादी अथवा आमदार आबिटकर गटाला आघाडीची गरज आहे.आघाडीसाठी राष्ट्रवादीत आणि माजी आमदार बजरंग देसाई यांच्या गटात बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. परंतु माजी आमदार बजरंग देसाई गटाची आकुर्डे मतदारसंघावर गेली दहा वर्षे सत्ता आहे. त्याचबरोबर या मतदारसंघावर या गटाचा विशेष प्रभाव आहे. त्यामुळे इथली जागा सोडल्यास राष्ट्रवादीत आणि त्यांच्यात युती होऊ शकते. इतरत्र ते आणखी एक जिप व पंचायत समितीच्या आठ जागांपैकी तीन जागांवर समाधान मानू शकतात. पण माजी आमदार के.पी.पाटील यांनी बिद्रीचे माजी संचालक जीवन पाटील यांना आकुर्डे मतदारसंघात उमेदवारी निश्चित केल्यामुळे ते तिथली जागा सोडण्यास राजी नाहीत. त्यातच या मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवराज बारदेस्कर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला असल्यामुळे राष्ट्रवादीत मतविभागणी झाली आहे. जि.प. व पं.स. चे उमेदवार अडचणीत सापडू शकतात. या मतदारसंघावर गेल्या दहा वर्षांतील सत्ता पाहता काँग्रेसची मागणी आणि राष्ट्रवादीची जीवन पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मागे घेण्यात निर्माण होणारी कोंडी यामध्ये या मतदारसंघातील उमेदवारी हीच खरी आघाडी होण्यात अडचण होत आहे.त्यात उद्योजक सयाजी देसाई हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असल्याने सर्वच राजकीय पक्षांची मते घेणार असल्यामुळे पुन्हा मतांची होणाऱ्या विभागणीने धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी आघाडीशिवाय पर्याय नाही. याशिवाय या मतदारसंघातून देवराज बारदेस्कर यांना भाजपने उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. कारण हा मतदारसंघ वगळता भाजपकडे इतर ठिकाणी एकही सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे भाजप हा मतदारसंघ सोडण्यास असमर्थ आहे. त्यामुळे युतीचे दरवाजे बंद करून टाकले आहेत.गतवेळी माजी आमदार बजरंग देसाई व माजी आमदार दिनकरराव जाधव, आमदार प्रकाश आबिटकर हे गट एकत्र येऊन लढले होते. त्यावेळी मठगाव मतदारसंघात एका उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. ते वगळता अन्य तिन्ही ठिकाणी या आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. तर पंचायत समितीचे चार सदस्य निवडून आले होते. या नंतरच्या काळात तालुक्यातील पश्चिम भागातील राष्ट्रवादीचे खंदे नेतृत्व कोकण केसरी के. जी. नांदेकर यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी धोक्यात आली आहे. याठिकाणी जाधव गट आणि नांदेकर गटांचा प्रभाव पाहता राष्ट्रवादी अथवा बजरंग देसाई गटांना एकाकी टक्कर देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.पिंपळगाव मतदारसंघात गतवेळी आघाडीचे उमेदवार प्राचार्य अर्जुन आबिटकर विजयी झाले होते. या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य होते पण सध्या आमदार आबिटकर गटाने केलेली बांधणी विचार करायला लावणारी आहे.गारगोटी मतदारसंघात : आजी माजी आमदारांचे भक्कम गटगारगोटी मतदारसंघात आजी माजी आमदारांचे भक्कम गट आहेत. शिवाय आमदार गटाकडे असणाऱ्या तुल्यबळ उमेदवारांनी बाजु भक्कम केली आहे. याठिकाणी सयाजी देसाई यांच्या पत्नी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. या मतदारसंघात सचिन घोरपडे यांच्या माध्यमातून बंटी पाटील गटाची बऱ्यापैकी असणारी मते दुर्लक्षीत करता येणार नाहीत.आमदार प्रकाश आबीटकर गटासोबत असणारी शिवसेना, माजी आमदार दिनकरराव जाधव गट, के. जी. नांदेकर गट व यांना आमदार बंटी पाटील यांच्या गटाची साथ मिळण्याची शक्यता याशिवाय सर्वच मतदारसंघात असणारे भक्कम उमेदवार, अशी सर्व बाजूंनी विचार करता आमदार गट भक्कम स्थितीत आहे. माजी आमदार बजरंग देसाई व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटांना एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. तिकीट नाकारण्यात आल्यावर भाजपच्या वाटेवर आणखी काही इच्छुक उमेदवार जाण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या बोजा बांधून तयार झालेले आहेत केवळ तिकीटं मिळाल्यास ठीक अन्यथा चलो .