शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

हुपरीच्या नगराध्यक्षपती भाजपच्या जयश्री गाट, १६00 मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:12 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील नगरपालिकेसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६00 मतांनी विजयी झाल्या. नगरसेवक पदासाठीच्या १८ जागांपैकी भाजपने ७, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने ५, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडीने २, शिवसेनेने २ तर अपक्ष शिवप्रतिष्ठान संघटनेने २ अशा जागा मिळविल्या.

ठळक मुद्देनगरसेवक : भाजप ७, ताराराणि ५, मनसे २, अपक्ष (शिवप्रतिष्ठान) २प्रभाग ९ मध्ये आश्चर्यकारक निकाल, शिवप्रतिष्ठानच्या संदीप वाईंगडे, सपना नलवडे विजयी

कोल्हापूर/हुपरी : कोल्हापूर जिल्ह्यातीलन व निर्मित हुपरी (ता. हातकणंगले) येथील नगरपालिकेसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६00 मतांनी विजयी झाल्या.नगरसेवक पदासाठीच्या १८ जागांपैकी भाजपने ७, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने ५, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडीने २, शिवसेनेने २ तर अपक्ष शिवप्रतिष्ठान संघटनेने २ अशा जागा मिळविल्या.प्रभाग ९ मध्ये आश्चर्यकारक निकाल लागला आहे. या प्रभागात एकाही राजकीय पक्षाला विजय मिळाला नाही. येथे शिवप्रतिष्ठानच्या संदीप वाईंगडे आणि सपना नलवडे यांनी विजय मिळविला.दरम्यान भाजपला बहुमत मिळालेले नसल्यामुळे या नगरपालिकेत अपक्ष आणि इतर पक्षांची मदत भाजपला घ्यावी लागणार आहे. उपमहापौर पद कोणाला द्यायचे, यावर सत्तेचे गणित राहणार आहे.

नगराध्यपदाच्या उमेदवार जयश्री गाट यांना प्रभाग १,२ आणि ३ मध्ये २७५0 मते मिळाली. विमल जाधव यांना ५९0, सीमा जाधव यांना २0२७, गीतांजली पाटील यांना १४४६, दीपाली शिंदे यांना ३४ तर ३८ मते नोटासाठी मिळाल्या.हुपरी नगरपालिकेतील प्रभागवार विजयी उमेदवार -प्रभाग १ : गणेश वाईंगडे - ताराराणी आघाडी , अनिता मधाळे - भाजपप्रभाग २ : सुरज बेडगे - ताराराणी आघाडी, रेवती पाटील - ताराराणी आघाडीप्रभाग ३ : अमर गजरे - मनसे आघाडी , सुप्रिया पालकर - भाजपप्रभाग ४ : दौलतराव पाटील - मनसे आघाडी, ऋतुजा गोंधळी - भाजपप्रभाग ५ : भरत लठ्ठे - भाजप, शितल कांबळे - ताराराणी आघाडीप्रभाग ६ : जयकुमार माळगे - भाजप, लक्ष्मी साळोखे - भाजपप्रभाग - ७ : रफिक मुल्ला - भाजप, पूनम पाटील - शिवसेनाप्रभाग - ८ : पिंटू मुधाळे - शिवसेना, माया रावण - ताराराणी आघाडीप्रभाग - ९ : संदीप वाईंगडे - अपक्ष, सपना नलवडे - अपक्ष (शिवप्रतिष्ठान)

नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या बुधवारी पार पडलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शांततामय व उत्साही वातावरणात ८५.३७ टक्के मतदान झाले. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेले नगराध्यक्षपद व ९ प्रभागांतील १८ नगरसेवकपदांसाठी नशीब आजमावत असलेल्या १०० उमेदवारांच्या नशिबाचा बुधवारी मतदारांनी मतदानरूपी केलेला फैसला आज, गुरुवारी स्पष्ट झाला. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होत असल्याने या निकालाकडे रौप्यनगरीवासीयां-बरोबरच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले .

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक