जोतिबा : कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी जोतिबा डोंगरावरील व्दारका रिसॉर्टने एक पाऊल पुढे टाकून कोविड सेंटर सुरू करण्यासाठी येथील प्रशासनाला साथ दिली आहे. योगेश भारती यांनी स्वतःचे हॉटेल कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जोतिबा डोंगरावर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे संपूर्ण जोतिबा डोंगर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कोविड काळात सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीदेखील आजमितीला कोरोना रुग्णांना उपचारासाठी सहज बेड उपलब्ध होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था, संघटना यांच्यासह हॉटेल्स, रिसॉर्ट क्षेत्रातील लोक देखील मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. जोतिबा डोंगरावर द्वारका हॉटेल प्रसिद्ध आहे. त्यांनी पण गावातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी ज्यांना बेड मिळत नाहीत, जागेअभावी घरी उपचार करता येत नाहीत, याची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोट...
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. द्वारकामध्ये २० बेड विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. दोन प्रशस्त हॉल, अनेक रूम्स, कॉटेजेस पाणी, वीज, पंखे, स्वच्छतागृह बाथरूम, यांसारख्या सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. आवश्यक वाटल्यास रुग्णवाहिका, वैद्यकीय उपचार यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस यांचा स्टाफ पुरवण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहे.
- योगेश भारती, संचालक, द्वारका रिसॉर्ट
३० जोतिबा
जोतिबा डोंगरावर हॉटेल द्वारकामध्ये कोविंड सेंटरचे लोकार्पण करताना सरपंच राधा बुणे , द्वारकाचे संचालक योगेश भारती, कोरोना दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.