अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, आझाद चौकातील दोन मजली इमारतीत एका मोबाईल दुकानासह ई-सेवा केंद्र आहे. या दोन्ही बंद दुकानांतून शनिवारी रात्री अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलास कळविली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब तत्काळ दाखल झाले. त्यांनी ही आग तासाभराच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पुढील काचा फोडून तेथील आग विझवण्यात आली. दरम्यान, या आगीत फर्निचर, संगणक, मोबाईल, आदींसह सुमारे सहा लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ही आग उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, अशोक साठे, सुभाष मगदूम, अभय कोळी, महेश पाटील, बाबूराव सणगर, आदींनी आटोक्यात आणली.
फोटो : १५०५२०२१ कोल आग