प्रदीप शिंदेकोल्हापूर : जरगनगर येथील कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, शाळा क्र. ७१ या शाळेने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कोल्हापूर शहरातच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये वेगळा ठसा उमटविला आहे. पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील मुले कायमच अव्वल, हे जणू समीकरणच बनल्याने शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच शाळेत हाऊसफुल्लचा फलक लागला आहे.
या शाळेची स्थापना ११ एप्रिल १९९४ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली. जरगनगर-रामानंदनगर, पाचगाव या परिसरातील मुलांना दर्जेदार, मोफत शिक्षण मिळावे हा एकमेव दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक नानासो जरग आणि सुपरवायझर विमल गवळी यांनी पुढाकार घेऊन ही शाळा सुरू केली. ४० विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरू झाली. शाळा टिकविण्यासाठी आणि सामान्य घरांतील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी येथील शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने प्रत्येक वर्षी विद्यार्थिसंख्येचा आलेख वाढत गेला.
शाळेत आज बालवाडीपासून ते सातवीपर्यंत सेमी माध्यम व मराठी माध्यमाचे वर्ग असून १ हजार ९६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, सेवकवर्ग कार्यरत आहेत. यामुळे सामान्य घरातील मुले शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल ठरली आहेत. मुलांच्या गुणवत्ता सुधारणांसह सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार, शालेय क्रीडा महोत्सव, बालसभा, विविध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वृक्षदिंडी, माता-पालक प्रबोधन मेळावा, शैक्षणिक सहली, वार्षिक स्नेहसंमेलन, आदी उपक्रम राबविले जातात. शाळेत ४० शिक्षक कार्यरत असून, सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन जादा तासांचे नियोजन केले जाते, हे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल.३८ वर्गशाळेमध्ये एकूण ३८ वर्ग आहेत. गतवर्षी बालवाडीमध्ये ३५० विद्यार्थी आणि पहिली ते सातवीपर्यंत १६१० विद्यार्थी असे एकूण १९६० विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेमध्ये मराठी माध्यमाबरोबर सेमी माध्यमाचे वर्गही सुरू करण्यात आले असून, आज शाळेत सेमी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या एकूण ३८ तुकड्यांमधून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शिष्यवृत्तीमध्ये ‘जरगनगर पॅटर्न’शाळेत पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची विशेष तयारी करून घेतली जाते. आज कोल्हापूर शहरात शिष्यवृत्तीसंदर्भात जरगनगर विद्यामंदिर पॅटर्न हा वेगळा ठसा निर्माण झाला आहे. सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. प्रत्येक वर्षी यामध्ये भर पडत असते. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विशेष मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा ‘जरगनगर पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो.पिण्याच्या पाण्याची गरजशाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्या मानाने पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच शाळेसाठी उपलब्ध असलेल्या मैदानाचे सपाटीकरण करून, पटसंख्या पाहता पाच वाढीव वर्ग उपलब्ध होणे तितकेच गरजेचे आहे.
उपनगरातील सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशानाचे ही शाळा सुरू केली. भाड्याच्या खोलीत सुरू झालेल्या शाळेची आज स्वत:ची इमारत आहे. सामान्य घरातील मुले गुणवत्ता यादीत येतात, हे पाहून खूप समाधान आणि तितकाच आनंदही होतो.- नाना जरग, माजी नगरसेवकविद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासह शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी भर देण्यात येत आहे. त्यामुळेच सलग दोन वर्षे महानगरपालिका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जरग विद्यामंदिरने अव्वल स्थान मिळविले. शाळेतील प्रत्येक कर्मचारी शाळा ही आपल्या कुटुंबातील एक घटक आहे, या भावनेने काम करतो.उत्तम गुरव, मुख्याध्यापकमराठी माध्यमाची पहिली ई-लर्निंग सुविधा असलेली शाळाबोलक्या भिंती व अभ्यासास पूरक सजावट असलेले वर्गशाळेच्या भौतिक सुविधांसाठी अनेकांकडून मदतविद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, खेळ, क्रीडा शिक्षण यांची सुविधा.