कोल्हापूर : गेले अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. त्यामुळे आले किती गेले किती, मुंबईकरांचे प्रेम फक्त सेनेवरच राहीले आहे. अशा शब्दात परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपावर निशाणा साधला. गुरुवारी करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ते कोल्हापूरात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.भाजपाने भाजपा येणार, मुंबई घडवणार हे घोषवाक्य महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी जाहीर केले आहे. यानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर टिका केली होती. त्यात मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र, आगामी काळात महापालिकेवर भगवाच असेल परंतु तो भाजपाचा असेल, असा निर्धार व्यक्त केले होता. त्याबद्दल बोलताना परिवहन मंत्री परब यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. खूप जण आले, खूप घोषणा केल्या. मात्र मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही.चांगल्या वाईट प्रसंगात सेना उभी राहीली आहे.लॉकडाून काळातील वीज बील माफ व्हावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. वीज बील सवलतीमध्ये अभ्यास करुन निर्णय घेतल्यास त्याचा किती जणांना लाभ होतो. याचा अभ्यास सुरु आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही परब यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या निधीवाटपाबाबत बोलताना परब म्हणाले, निधी वाटप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडवतील. निधी वाटपाचा प्रश्न बसून ठरवता येतो.मुंबई महापालिकेची सत्ता भाजपाला द्यायला जनता मुर्ख नाही, असा टोला भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही जोरदार टिका केली. याबाबत राणे यांनी आगामी महापालिका निवडणूकीत भाजपाची सत्ता येईल असे वक्तव्य केले होते. याबद्दल परिवहन मंत्री परब यांनी टिका केली.
आले किती गेले किती, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरच, परब यांनी साधला भाजपावर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 1:37 PM
anilparab, mumbaimahapalika, shiv sena, bjp, kolhapurnews, minister गेले अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. त्यामुळे आले किती गेले किती, मुंबईकरांचे प्रेम फक्त सेनेवरच राहीले आहे. अशा शब्दात परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपावर निशाणा साधला. गुरुवारी करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ते कोल्हापूरात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ठळक मुद्दे आले किती गेले किती, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरच, परब यांनी साधला भाजपावर निशाणा कोल्हापूरात परब यांनी घेतले करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन