शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

दरोडेखोरांच्या सत्तेत ५० टक्के भागीदार कसे?

By admin | Published: May 19, 2017 12:12 AM

दरोडेखोरांच्या सत्तेत५० टक्के भागीदार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : आताचे भाजप सरकार संवेदनाशून्य असून या सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली आहे. शिवसेना भाजपला दरोडेखोरांचे सरकार म्हणते, मग शिवसेना सत्तेत ५० टक्के भागीदार कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्गमधील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून, पालकमंत्र्यांना नुकसानग्रस्तांना साधा धीरही द्यायला वेळ नाही, अशी टीका केली.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, कवाडे गट यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप गुरूवारी सावंतवाडीत झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, राजेश टोपे, सुनिल केदार, जयराम शिदे, आमदार हस्राबानू खलिफे, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हा परीषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिकटर डॉन्टस, जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, अबिद नाईक, विकास सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, विशाल परब, सुधीर आडिवरेकर, राजू मसूरकर आदि उपस्थीत होते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदीवर टिका केली ५६ इंच छाती असणारे पतप्रंधान हे जवानाचे नातेवाईक आंदोलन करताना गप्प का बसले, एक सैनिक मारला तर पाकिस्तानचे दहा सैनिकाचे धड मारून आणू असे सांगत होते. पण आता यातील काही दिसत नाही, खोटे बोलून हे सरकार सत्तेवर आले आहे. कोकणातील दहा आमदार, खासदार राज्यात व केंद्रात मंत्री पदावर आहे. मग कोकणचा विकास का झाला नाही असा सवाल करीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू झाल्यावर झपाट्याने कोकण रेल्वेचा विकास झाला पाहिजे होता. पण रेल्वेचे वाटोळे करण्याचे काम प्रभंूनी केले आहे. प्रत्येक राज्यातील रेल्वेमंत्री झाले तेथील विकास बघा आणि प्रभू रेल्वेमंत्री झाल्यावर काय विकास झाला तो बघा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.यावेळी माजी मंत्री जंयत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार नितेश राणे आदींनी विचार मांडले. तर संवाद यात्रेचा समारोप उपस्थितांना हात उंचावून अभिवादन करून करण्यात आला.सर्वात असंवेदनशिल सरकार : राणेयावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले, राज्यातील आता पर्यंतच्या माझ्या कारर्किदीत बघितलेले सर्वात असवेंदनशील सरकार आहे. राज्यावर आपत्ती आली कि सर्वजण एक होतात मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तर शिवसेना भाजप एक होऊन त्यावर मार्ग का काढत नाही, कर्ज माफी का देत नाही? असा सवाल त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा यापूर्वी टँकरमुक्त केला तसेच प्रत्येक गावात गुरे जातात, त्या ठिकाणीही रस्ते झाले, पण आताचे सरकार नियोजनशुन्य आहे. प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार आहे. आघाडी सरकार सत्तेत असताना सर्व काही दिले पण आता हे सरकार कोकणातील बागयतदाराला वाऱ्यावर सोडून देण्याचे काम करीत आहे, अशी टिकाही राणे यांनी केली.तहसिलदार, प्रांताधिकारी अवकाळीग्रस्तांना भेटले नाहीसिंधुदुर्गमध्ये बांदा डेगवे येथे अवकाळी पाउस झाला यात शेतकऱ्यांचे मोठे नूकसान झाले मात्र पालकमंत्री येथे तूर घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : पृथ्वीराज चव्हाणमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात यावेळी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले, मात्र शासनाला तूर उत्पादन किती झाले यांची माहितीच नाही ही शोकांतिका आहे.तूर आयात करण्याची गरज नव्हती, निर्यात झाली पाहिजे होती पण सरकारला आपले धोरणच ठरवता आले नाही, त्यामुळेच मुख्यमंत्री हे तूरमध्ये चारशे कोटींचा घोटाळा झाला असे सांगतात. जर घोटाळा झाला असेल तर राज्यातील यंत्रेणेऐवजी सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी चव्हाण यांनी केली. तसेच यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या होत नव्हत्या, पण आता पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होत आहेत. शिवाय अगोदर शेतकरी आत्महत्या करत होत; पण आता त्यांची मुले आत्महत्या करायला लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली.