लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डेल्टा प्लस विषाणूचा प्रसार वेगाने वाढत असताना, त्याला रोखण्याचे सामर्थ्य असलेल्या लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने याला रोखायचे कसे, असा नवा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यात पहिला डोस ३३ टक्के नागरिकांनी घेतला आहे. पहिला आणि दुसरा डोस अवघ्या ९ टक्के नागरिकांना मिळाला आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत चोरपावलांनी आलेला डेल्टा प्लस विषाणूने आता वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. हा विषाणू घातक असल्याचा संशोधकांचा निष्कर्ष पाहता, यावर लसीकरण हाच उत्तम उपाय आहे; पण नेमके घोडे येथेच अडत आहे. लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने या डेल्टाचा सामना करायचा तरी कसा? या विवंचनेत आरोग्य विभाग आहे. नागरिकही लस मिळत नसल्याने हतबल आहेत. जिल्ह्यात ३१ लाख २६ हजार ९१७ नागरिकांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी पहिला डोस १० लाख ४२ हजार ९४८ जणांना मिळाला आहे. पहिला आणि दुसरा डोस २ लाख ८६ हजार ९२१ जणांनी आतापर्यंत घेतला आहे. यात फ्रंटलाईन वर्कर आघाडीवर आहेत.
तालुका पहिला दुसरा
आजरा ३४२९८ ९०५२
भुदरगड ४२५०९ ९३६२
चंदगड ५१९५४ १३७०९
गडहिंग्लज ६१२५५ १७१०७
गगनबावडा ९७८५ २५७९
हातकणंगले १६०९७८ ४६७६८
कागल ६१६३६ १२५३८
करवीर १८८९३८ ६०६६८
पन्हाळा ५४१५२ १२८७२
राधानगरी ५२४७२ १४५३८
शाहूवाडी ४८४९९ १२७८०
शिरोळ ८५३९९ २०३२५
लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट : ३१ लाख २६ हजार ९१७
आतापर्यंत दोन्ही डोस मिळालेले : २ लाख ८६ हजार ९२१
पहिला डाेस : १० लाख ४२ हजार ९४८
दुसरा डाेस : २ लाख ८६ हजार ९२१
गट उद्दिष्ट पहिला डोस टक्केवारी दुसरा डोस टक्केवारी
हेल्थ केअर वर्कर ३८२२६ ४३७६४ ११४ २३३६३ ६१
फ्रंटलाईन वर्कर २९८२१ ७९६८० २६७ २७५८० ९२
१८ ते ४४ १८५२३६८ १७९९९ १ ६१६२ ०
४५ ते ६० १५२३३७२ ४१५८०६ ५६ ८१२३४ १५
६० वर्षांवरील ४३६१३३ १५१२०१
एकूण ३४४३८१७ ९९३३८२ ७७ २८९५४० २२
१८ ते ४४ वयोगटात केवळ १ टक्के
डेल्टा प्लस विषाणूचा सर्वाधिक मारा हा तरुण वर्गावर होत असल्याचा संशोधनाचा निष्कर्ष असला तरी लसीकरणात मात्र १८ ते ४४ वयोगट खूप मागे आहे. आतापर्यंत या वयोगटातील केवळ १ टक्का लसीकरण झाले आहे. १८ लाख ५२ हजार ३६८ इतकी या वयोगटातील तरुणांची संख्या आहे; पण यातील केवळ १७ हजार ९९९ म्हणजेच १ टक्का लसीकरण झाले आहे. दुसरा डोस तर एकालाही दिलेला नाही.