शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

करुळ, भुईबावडा किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 11:15 PM

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची ...

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची अवस्था अतिशय बिकट असून नजीकच्या कालावधीत जर या घाटाकडे प्राधान्याने लक्ष दिले नाही, तर हा घाट अस्तित्वहीन झाल्याशिवाय राहणार नाही.पन्नाशी ओलांडून गेलेल्या या दोन्ही घाटांची निर्मिती त्यावेळचे तत्कालीन आमदार वैभववाडी तालुक्यातील करूळ गावचे कै. ए. पी. सावंत यांच्या प्रयत्नाने सन १९६५ च्या दरम्यान एकाचवेळी गगनबावडा येथून खारेपाटण-राजापूर हा भाग जोडणारा भुईबावडा घाट तर विजयदुर्ग- मालवण-गोवा यांच्याशी संपर्क जोडणारा अशा दोन्ही घाटांची खुदाई सुरू झाली.तीन वर्षांच्या कालावधीनंतर या दोन्ही घाटांतून वाहतूक सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. साधारणता या पन्नास वर्षांच्या कालावधीत पावसाळी मौसम सुरू झाला की थोड्या फार प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार त्यामुळे वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात.सन १९९४-९५च्या दरम्यान यापैकी करुळ घाटाने एक भीषण अपघात पाहिला. सेंट्रिंगचे सामान व मजूर घेऊन कुडाळाकडे जाणारा ट्रक घाटाच्या भीषण दरीत कोसळून या अपघातात २४ मजुरांचा अंत झाला व नेहमीप्रमाणेच मोठ्या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने तत्काळ संपूर्ण घाट रूंदीकरण्याचे काम हाती घेतले. त्यामुळेच रुंदीकरण झालेला हा घाट काहीसा सुरक्षित आहे, असे म्हणता येईल.भुईबावडा घाटाच्या तुलनेत काहीसा सुरक्षित असलेल्या या घाटातही संभाव्य धोकादायक ठिकाणेही आहेत. यात एक दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मध्यावर भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी मोठे कडे कोसळण्याची स्थितीही आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोखंडी नेट लावून हे कडे थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या नेटने हे कडे पेलू शकतील का? याचे उत्तर नकारार्थीच असेल.निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या जणू हिरवी शाल लपटलेल्या या घाटात काही प्रमाणात हौशी तरूण पर्यटकांचा वावर होताना दिसत आहे. पर्यटन म्हणजे आजच्या तरुणांच्या समजुतीनुसार दारू पिणे व घाटात कोळणाऱ्या धबधब्याखाली भिजणे यानुसार अनेक तरूण तरुणी घाटात प्रवास करताना दिसतात. दारू पिऊन अर्धवट कपड्याात प्रवाशांना अडविणे. अर्वाच्च भाषा वापरणे यासारखे प्रकार वारंवार घडत असतात. यासाठी किमान रविवार वा सुटीच्या दिवसात तरी पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे.भुईबावडा घाटाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. खारेपाटण- राजापूर-पाचलला जोडणाºया या मार्गावर तुलनेत कमी वाहतूक असल्याने सा. बां. विभागाकडून दुर्लक्षित असलेल्या या घाटाचे रूंदीकरण प्रामुख्याने होणे आवश्यक आहे. अरूंद असलेल्या या घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचून भेगा पडत आहेत.संपूर्ण घाटात अनेक ठिकाणी या पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडू शकतात. या घाटाच्या दुरुस्तीस प्राधान्य देऊन संपूर्ण घाटाचे रुंदीकरण करावे लागेल तरच यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल. अन्यथा येणाºया पुढच्या पिढीस या ठिकाणी भुईबावडा घाट होता, असे सांगण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.अवजड वाहतुकीवर हवा लगामकरूळ घाटमार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवैध होणाºया वाहतुकीबरोबर अवजड वाहनांची रहदारी यामार्गे वाढली आहे. घाटरस्त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने यामार्गे होणाºया अवजड वाहनांबाबत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यात पोलिसांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने घाटमार्गाला पर्यटकांनी दिलेली पसंती समाधानकारक असली तरी घाटमार्गावर रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहनांची होणारी वाहतूक तितकीच चिंतेची बाब बनली आहे. लोखंड तसेच इतर अवजड वस्तू भरलेल्या गाड्या या मार्गाने जात आहेत तसेच आकाराने लांब असलेली वाहने घाटमार्गातून जाताना अनेक अडचणी निर्माण होतात. अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचल्यास घाटमार्गच बंद पडण्याची भीती काही जाणकारांमधून व्यक्त होत आहे.