शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

वायुदलाच्या हेलिकॉप्टरची मदतकार्यात मोठी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:48 AM

गेल्या पाच दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी आवश्यक अशा ४0 टन वस्तूंचे वितरण या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या संकटात ठरले देवदूत ४0 टन साहित्याचा केला पुरवठा; अव्याहतपणे केले काम

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अनेक गावांवर महापुराचे संकट कोसळले असताना वायुदलाचे एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर या सर्वांसाठी देवदूत ठरले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी आवश्यक अशा ४0 टन वस्तूंचे वितरण या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात आले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, म्हाडाचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून समन्वय ठेवला; तर प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, कृषी अधिकारी अतुल जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संग्राम धुमाळ, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात यांच्यासह पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर विमानतळावरील यंत्रणा सांभाळली.

रोज सकाळी जीवनावश्यक वस्तू आल्यानंतर त्या भरून कुरुंदवाड येथे उतरल्या जात. शिरोळ येथील दत्त कारखान्यावर आलेले साहित्यही कुरुंदवाड येथे आणून दिले जाई. काही गावांमध्ये टेरेसवरही वस्तू देण्यात आल्या. ग्रुप कॅप्टन श्रीधर, पायलट कृष्णन, सहपायलट नवाज, स्क्वाड्रन लीडर संदीप पोवार, फ्लाईट गनर जे. डब्ल्यू गुप्ता, फ्लाईट इंजिनिअर साजन गोगोई यांची टीम या हेलिकॉप्टरसाठी कार्यरत आहे.कोल्हापूरच्या सुपुत्राचाही सहभागया हेलिकॉप्टवर कार्यरत असणारे स्क्वॉड्रन लीडर संदीप पोवार हे मूळचे सरवडे (ता. राधानगरी) येथील. सातारा येथील सैनिक स्कूल आणि कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. २००९ साली ते वायुदलात दाखल झाले.

आसाम, राजस्थान येथे सेवा बजावल्यानंतर गेली तीन वर्षे ते मुंबईत कार्यरत आहेत. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांनी आपल्या या जिल्ह्यात आलेल्या आपत्तीवेळी सर्व अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय ठेवत नेटकी कामगिरी बजावली आहे.रॉकीचाही सहभागबॉम्बशोधक व नाशक पथकातील रॉकी या श्वानानेदेखील आपली सेवा विमानतळावर बजावण्याचे चोख काम सुरू ठेवले आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणतेही साहित्य पोहोचविण्यापूर्वी तसेच ठेवल्यानंतरही त्याच्याकडून तपासले जाते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर