शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मृताचा अंत्यविधी सन्मानपूर्वक करणारी कोल्हापुरातील ‘मानवसेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:39 AM

भरत बुटाले‘कोणत्याही मृताचा अंत्यविधी सन्मानपूर्वकच झाला पाहिजे,’ असं मुलखावेगळं ब्रीद घेऊन १९९९ मध्ये कोल्हापुरात मानवसेवा सेकंड इनिंग्ां होम्स ही नोंदणीकृत संस्था उदयाला आली. शहाजी माळी यांनी मित्र किशोर नैनवाणींसोबत या सेवेला प्रारंभ केला. संस्थेने १९ वर्षांत सुमारे ४,000 बेवारस मृतांना सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला; तेही कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून...‘जिसका कोई ...

भरत बुटाले‘कोणत्याही मृताचा अंत्यविधी सन्मानपूर्वकच झाला पाहिजे,’ असं मुलखावेगळं ब्रीद घेऊन १९९९ मध्ये कोल्हापुरात मानवसेवा सेकंड इनिंग्ां होम्स ही नोंदणीकृत संस्था उदयाला आली. शहाजी माळी यांनी मित्र किशोर नैनवाणींसोबत या सेवेला प्रारंभ केला. संस्थेने १९ वर्षांत सुमारे ४,000 बेवारस मृतांना सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला; तेही कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून...‘जिसका कोई नही होता, उसका खुदा होता है...’ असं म्हणावं असं काम करणारी ही आदर्श संस्था. नैसर्गिक मृतांव्यतिरिक्त गळफास घेतलेले, जळालेले, पाण्यात बुडालेले, रेल्वे रुळावर तुकडे होऊन पडलेले, सडलेले अशा कोणत्याही अवस्थेत असलेल्या बेवारस मृतदेहांवर सोपस्कार पार पाडण्यात संस्थेचे कार्यकर्ते आघाडीवर असतात.‘मानवसेवा’चे कार्य थक्क करणारे आहे. मार्च २०१७मधील ही घटना. येथील कात्यायनी मंदिरासमोर निर्जन स्थळी घरात वितळलेल्या अवस्थेत लटकलेला मृतदेह होता. पोलिसांकडून बोलावणे येताच किशोर नैनवाणी, अर्जुन कांबळे, अंजूम शेख यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. तो मृतदेह खाली उतरवून सीपीआरमध्ये नेला. तेथे कायदेशीर प्रक्रियेनंतर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. हे झाले एक उदाहरण.मृताच्या घटना शक्यतो पोलिसांकडून समजतात. त्यावेळी संस्थेचे उपलब्ध कार्यकर्ते घटनास्थळी जातात. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली करतात, तेथून तो मृतदेह सीपीआरमध्ये नेला जातो. त्याची छायाचित्रे काढली जातात. तेथील पोलीस चौकीत हरविलेल्यांची यादी तपासली जाते. त्यात मिळतं-जुळतं कोण असेल, तर संबंधितांच्या नातेवाइकांना फोन केला जातो. त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंंवा त्यांनी माहिती ऐकून फोन बंद केलाच तर तो मृतदेह बेवारस ठरवून शवविच्छेदन केले जाते. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह संस्थेच्या ताब्यात दिला जातो. पंचगंगा स्मशानभूमीतील स्वतंत्र बेडवर त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.अंत्यविधी सन्मानपूर्वक...मृतदेह सरणावर ठेवल्यानंतर कार्यकर्ते, पोलीस, कर्मचारी, आदी सर्व ओळीत उभारून मानवंदना देतात. गीतेतल्या ‘वासाशी जिरर्नानी....’ श्लोकामध्ये सांगितलेल्या ‘देह नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे’ या वचनाचा उल्लेख करून अंत्यसंस्कार पार पाडले जातात.‘मानवसेवा’चे अन्य कार्यकर्तेमाजी सैनिक श्रीकांत चव्हाण, सचिन राऊत, प्रमोद चरणकर, कॉ. रघुनाथ कांबळे, योगेश अग्रवाल, गौरीशंकर संगोळी, पंडित मस्कर, सुप्रिया देशपांडे, आदी कार्यकर्ते ‘मानवसेवा’भावी कार्य करतात. या कार्यात रेल्वे स्थानकावरील संकटविमोचक मारुती मंदिर ट्रस्ट तसेच द्वारकादास शामकुमार कापड दुकान, यांचेही सहकार्य लाभते.हवा आर्थिक हातभार!आपत्कालीन परिस्थितीत २०० वर अंत्यविधीसाठीचे साहित्य तयार असते.ते मोफत दिले जाते. प्रत्येक मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी २५० रुपये खर्चहोतो. मृतदेह हाताळताना संसर्गजन्य आजारापासून संरक्षणासाठी मास्क, हँडग्लोज आदी साहित्य वापरावे लागते. मृतदेहासाठी कापड व इतर साहित्यही लागते. हा खर्च कार्यकर्तेच करतात. समाजाने पुढाकार घेऊन यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.बेवारस मृतदेहाचे नातेवाईक सापडावेत व आपली व्यक्ती शेवटच्या क्षणी तरी मिळावी, या हेतूने ६६६.२ीूङ्मल्ल्िरल्लल्ल्रल्लॅँङ्मेी२.ूङ्मे नावाने संस्थेने वेबसाईट तयार केली आहे.