शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

कोल्हापूर विभागातील २७ कारखान्यांकडून शंभर टक्के एफआरपी, २२३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले

By राजाराम लोंढे | Published: January 10, 2023 5:44 PM

एक रकमी एफआरपी पहिली उचलीची घोषणा केल्याने ऊस दराचे आंदोलनही फार ताणले गेले नाही

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ३४ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. त्यापैकी तब्बल २७ कारखान्यांनी १५ डिसेंबर २०२२ अखेर गाळप केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना सगळे २२३२ कोटी ७१ लाख रुपये अदा केले आहेत. पाच कारखान्यांकडे १४३ कोटी ४७ लाखांचे येणे बाकी आहे.यंदाच्या हंगामात ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तशी विभागातील सर्वच कारखान्यांची सुरुवात दबकतच झाली. एक रकमी एफआरपी पहिली उचलीची घोषणा केल्याने ऊस दराचे आंदोलनही फार ताणले गेले नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हंगामाने गती पकडली.

१५ डिसेंबरपर्यंत विभागात ८५ लाख २७ हजार टनाचे गाळप कारखान्यांनी केले आहे. त्याचे एफआरपीप्रमाणे २२३२ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्याप १४३ कोटी ४७ लाख १७ हजार रुपये एफआरपीमधील येणे बाकी आहे.उसाच्या वजनाला फटकायंदा उसाला अपेक्षित वजन मिळत नाही. एकरी पाच ते सात टनाने उसाचे उत्पादन कमी मिळत आहे. सततच्या पावसाचा परिणाम उसाच्या वाढीसह वजनावर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोल्हापूरचा उतारा १२.५० टक्केकोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा १२ टक्के राहिला आहे. त्यातही काेल्हापूर जिल्ह्याचा उतारा सरासरी १२.५० टक्के असून सांगलीचा ११.९० टक्के आहे. येथून पुढे उताऱ्यात वाढ होणार आहे.

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने :आजरा, राजाराम, शाहू, दत्त-शिरोळ, बिद्री, जवाहर, कुंभी, शरद, वारणा, अथणी-बांबवडे, डी. वाय. पाटील, दालमिया, गुरुदत्त, इको केन-चंदगड, अथणी-तांभाळे, अथर्व-दौलत, राजाराम बापू, राजाराम बापू (वाटेगाव युनिट), राजाराम बापू (कारंदवाडी युनिट), पतंगराव कदम, दत्त इंडिया, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया भारत, सद्गुरू श्री. श्री. (आटपाडी).

यांच्याकडे राहिली एफआरपीकारखाना                          देय रक्कमउदगिरी, खानापूर            १ कोटी ९३ लाखहुतात्मा, वाळवा               २४ कोटी ३ लाखसंताजी घोरपडे               २७ कोटी ४५ लाखओलम, राजगोळी           २५ कोटी ५५ लाखपंचगंगा, इचलकरंजी      २१ कोटी २८ लाखमंडलीक, हमीदवाडा     ३५ कोटी ५ लाखभोगावती, परिते             ४२ कोटी ९१ लाख. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने