शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगडावर सापडले ४०० तोफगोळे; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 11:03 AM

pavangad kolhapur : पावनगड हा स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. आता हा गड वनविभागाच्या ताब्यात आहे.

पन्हाळा - पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर ४०६ तोफगोळे सापडले आहेत. हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. गडावरील दिशादर्शक फलक लावताना हे तोफगोळे सापडल्याची माहिती वनविभागच्या परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका दळवी यांनी दिली.

पन्हाळ्या जवळील पावनगडावर गेले कांही दिवसांपासून तुपाची विहिर, निरनीराळी देवळे व विहिरी अशा ठिकाणी वनविभागामार्फत दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरु आहे. यासाठी कोल्हापुरमधील काही युवक मदत करत आहेत. आज सकाळी महादेव मंदिराजवळील दिशादर्शक फलक लावण्यासाठी खोदकाम करताना अवघ्या दोन ते तीन फुटावर काही दगडी तोफगोळे सापडले. त्यानंतर आणखी खोदले असता सुमारे ४०६ लहान मोठे तोफगोळे सापडले. ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाली आणि पवनगडाकडे बघ्यांची गर्दी झाली होती. 

पावनगडचा इतिहास.... १६६० मध्ये पन्हाळगडाला आदिलशाही सरदार सिद्दी जौहरचा वेढा पडला. त्यावेळी पन्हाळगडाजवळच्या मार्कंडेय पर्वतावरून सिद्धी सैन्याने शिवछत्रपतींच्या मावळ्यांवर तोफेचा मारा केला होता. या पर्वताचा पन्हाळगडाला असणारा धोका ओळखून शिवछत्रपतींनी मार्कंडेय पर्वतावर स्वतंत्र किल्ला बांधून घेतला. ( इसवी सन १६७४) तत्पूर्वी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशाहीकडे असणारा पन्हाळगड अवघ्या ६० मावळ्यांनिशी स्वराज्यात आणला. शिवछत्रपतींनी रयतेच्या स्वराज्याचे कल्पक अभियंते अर्जोजी यादव व हिरोजी फर्जद यांच्यावर पावनगड बांधण्याची जबाबदारी सोपविली. आटोपशीर अशा या गडाला दोन प्रवेशद्वार करण्यात आली होती. त्यांना हणमंत आणि दक्षिण दरवाजा अशी नावे देण्यात आली होती. यापैकी हणमंत दरवाजा कालौघात इतिहासजमा झाला आहे.

पावनगड हा स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. आता हा गड वनविभागाच्या ताब्यात आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार पूर्वीच्याकाळी तोफगोळे सापडलेल्या ठिकाणी दारूगोळ्याचे कोठार होते असे म्हणले जाते. वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वन संरक्षक एस.डी.निकम यांनी भेट देऊन या ठिकाणचा पंचनामा करुन हे तोफगोळे ताब्यात घेतले असून जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार हे पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केले जातील असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड