शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील ४८ हजार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 2:06 PM

जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन संंबंधित यंत्रणेला या संदर्भात निर्देश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४८ हजार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार कधी ? : कोरोनाची झळ

प्रवीण देसाईकोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन संंबंधित यंत्रणेला या संदर्भात निर्देश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे.कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी व्यक्तींना सूट देण्यात आली आहे; परंतु दिव्यांगांना घरातून बाहेर पडणे व वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेत थांबणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

ही बाब लक्षात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करावे किंवा तत्काळ विनारांग रेशन द्यावे, असे निर्देश शहर प्रभाग समिती व ग्रामस्तरीय समितीला दिले. तसेच तात्पुरत्या निवारागृहातील दिव्यांगांची माहिती घेऊन त्यांना स्वयंसेवकांनी मदत देण्याबाबतही सांगितले आहे.अंथरुणाला खिळलेल्या, तीव्र, अतितीव्र दिव्यांगांना सॅनिटायझर, मास्क, डेटॉल, फिनेल, आदी वस्तूही पुरविण्यात याव्यात. गरजू दिव्यांगांची आवश्यकता असेल तेथे स्वयंसेवी संस्थेमार्फत जेवणाची सोय करावी. राष्ट्रीय बँका व इतर बँकांमध्ये दिव्यांगांना रांगेत न थांबविता तत्काळ सेवा द्याव्यात. दिव्यांगांच्या शारीरिक दुर्बलतेमुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे विशेष बाब म्हणून सर्व बँका, रेशन दुकानदारांनी त्यांना प्राधान्य द्यावे. यासह दिव्यांगांना एक महिन्याची आगाऊ पेन्शन देण्याची सूचनाही संबंधित विभागाला केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असले तरी ग्राम व शहर स्तरांवरील समित्यांकडून याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. काही गावांत दिव्यांगांनी ग्रामसेवकांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडून आम्हाला अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत; त्यामुळे तुम्हाला जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आम्ही जायचे कोणाकडे व दाद कोणाकडे मागायची, असा सूर दिव्यांग बांधवांमधून उमटत आहे. जिल्ह्यात जवळपास ४८ हजार दिव्यांग बांधव असून सर्वजण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

दिव्यांगांना प्राधान्याने जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासंदर्भात ग्राम व शहर प्रभाग समित्यांना निर्देश दिले आहेत. त्यांना याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. तरीही यामध्ये टाळाटाळ झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देण्याचे आदेश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विशेषत: ग्रामीण भागातील दिव्यांग मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.- देवदत्त माने, जिल्हाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना

दिव्यांग हे घराबाहेर पडू शकत नसल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तू बाजारात जाऊन आणणे शक्य नाही. मदतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील दिव्यांग बांधवांकडून फोन येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.- अनिल मिरजे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अपंग साहाय्य सेना

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरDivyangदिव्यांग