संतोष बामणे --जयसिंगपूर -माणसाला पोटाची खळगी भरण्यासाठी कोणतेही काम करावे लागते़ हे काम अगदी कोणत्याही प्रकारचे असले तरी त्यातून पैसा मिळविण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करावा लागेल याची प्रचिती देणारा प्रसंग म्हणजेच उदगाव (ता़ शिरोळ) येथील वैकुंठधाम येथील रक्षाकुं डमधून कणभर सोने शोधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह काही नागरिकांना करावा लागतो़सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथे जयसिंगपूर, संभाजीपूर, चिपरी, उदगाव, धामणी, अंकली, काळम्मावाडी, आदी गावांतील अंत्यसंस्कार उदगाव वैकुंठधामात होत असतात़ येथे ३० लाख रुपये खर्चून वैकुंठधामाचे नूतनीकरण करण्यात आले आहे़ यामध्ये नदी प्रदूषित होऊ नये या हेतूने रक्षाकुंड बांधण्यात आले आहे़ दररोज दहापेक्षा अधिक मृत झालेल्या व्यक्तींची रक्षा या रक्षाकुंडात विसर्जित केली जाते़गरीब व हातावरचे पोट भरणाऱ्या काही लोकांचे याठिकाणी दिवसभर रक्षाकुंडात सोने शोधण्याचे काम सुरू असते़ यामध्ये थोडे का होईना सोने सापडते, या आशेने दिवसभर त्यांचा प्रयत्न सुरू असतो़ काहींना सोने सापडते, काहींना नाही. अशा परिस्थितीत अनेक गरीब व्यक्ती या कुंडात सोन्याचा शोध घेत असतात़ यातून त्यांना दररोज पाचशे ते एक हजारपर्यंतच्या रकमेचे जळके सोने सापडते़ हे सोने विकून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत़सध्या वैकुंठधामच्या रक्षाकुंडात अनेक लोकांची रांग लागलेली असते़ सध्या ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ सोने गोळा करणाऱ्या लोकांनी दोन-दोन दिवस नंबराने वाटून घेतल्याचेही बोलले जात आहे़ यातूनच गरिबी किती बेताची असते, हे लक्षात येते़ (प्रतिनिधी)येथील वैकुंठधामाचे नूतनीकरण एक वर्षापासून झाले आहे़ यामध्ये नदी प्रदूषित होऊ नये यासाठी रक्षाकुंडाची निर्मिती केली आहे़ या रक्षाकुंडामध्ये गरीब लोकांकडून कणभर सोन्याचा शोध सुरू असतो़ यातून थोडे का होईना सोने सापडल्यानंतर ते विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे लोक करीत आहेत़- शांताराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते
कणभर सोन्यासाठी स्मशानभूमीत शोधाशोध
By admin | Published: June 27, 2016 10:34 PM