कोल्हापूर : आरोग्यदायी आणि आनंददायक अनुभव देणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक बनली आहे. कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या तिसºया पर्वासाठी उत्स्फूर्त प्रतिसादात नावनोंदणी सुरूझाली आहे. धावपटू, कोल्हापूरकरांनी या महामॅरेथॉनमधील आपला सहभाग निश्चित करण्यासाठी त्वरित नावनोंदणी करावी.या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन’, १६ पेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची पॉवर रन होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची फॅमिली रन आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे.
येथील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारीला पहाटे पाच वाजता या मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. या मॅरेथॉनमधील विविध गटांमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. नोंदणीची अंतिम मुदत शनिवारी (दि. २१)आहे. आरोग्यदायी, आनंददायक अनुभव घेण्यासाठी धावपटू, कोल्हापूरकरांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधामहामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा. नोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि.२१) पर्यंत आहे. या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी आजच नोंदणी करा.प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य
- ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
महामॅरेथॉनची वैशिष्ट्ये* विजेत्यांसाठी एकूण सहा लाखांची बक्षिसे* विविध पाच गटांमध्ये आयोजन* संयोजनात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर * अचूक नियोजन
‘लोकमत महामॅरेथॉन’ हा उपक्रम उल्लेखनीय आहे. त्यातून आरोग्याबाबत सजग होण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात येतो. विशेषत: महिलांना देखील प्रोत्साहन मिळते. आणखी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही महामॅरेथॉन होते. कोल्हापुरातील मॅरेथॉनमध्ये लहान मुले, महिला असे सर्वच वयोगटांतील व्यक्ती उत्साहाने सहभागी होतात. गेल्यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये ‘पिंकेथॉन’च्या सुमारे शंभर सदस्या सहभागी झाल्या होत्या. धावणे हा महिलांसाठी चांगला व्यायाम आहे. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त या महामॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे.- आरती संघवी, ब्रँड अॅम्बेसेडर, पिंकेथॉन
शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यावर माझा अधिक भर असतो. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करण्यासह विविध मॅरेथॉनमध्ये मी सहभागी होतो. मी सहभागी झालेल्या, अनुभव घेतलेल्या मॅरेथॉनपैकी ‘लोकमत महामॅरेथॉन’ खूपच उत्कृष्ट आहे. या महामॅरेथॉनचा अनुभव खूप चांगला असल्याचे अनेकांनी मला सांगितले आहे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे पाहून इतरांनी आरोग्याबाबत तंदुरूस्त राहण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. आरोग्यदायी उपक्रम असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे.-स्वप्निल भिसे, युनिट मॅनेजर, आयनॉक्स, कोल्हापूर