जोतिबा : जोतिबा डोंगरावर वावर जत्रा या कुलाचार विधीसाठी नवदांपत्यांची गर्दी वाढु लागली आहे. नववधुवर देवाच्या साक्षीने लग्नगाठ मारून संसार सुखाचा होउददे यासाठी जोतिबा चरणी साकडे घालत आहेत. वैशाख महिना असल्याने लग्नसराईचा हंंगाम जोरात सुरू झाला आहे. वैशाख महिन्यात लग्न झाल्यानंतर जोतिबा दर्शनसाठी नववधुची वावर जत्रा हा कुलाचार विधी पुर्ण करण्यासाठी मोठी धांदल असते. दोन दिवसापासुन जोतिबा मंदिरात नवदांपत्यांची गर्दी आता वाढु लागली आहे. लग्न झाल्यानंतर जोतिबा मंदिरात वावर जत्रा काढण्याचा पुर्वापार रिवाज आहे. आज हि तितक्याच श्रध्देने हा कुलाचार विधी पुर्ण करताना नववधुवर दिसतात.जोतिबाचे स्थानिक पुजारी यांच्या कडुन हा कुलाचार विधी के ला जातो. नववधुवरांची देवाच्या साक्षीने परत एखदा लग्न गाठ बांधली जाते. नववधुवर जोडीने देवासमोर पानसुपारी व श्रीॅॅफळ ठेवून देवाचा आशिर्वाद घेतात. देवाला लग्नाचा आहेर अर्पण करतात. आपल्या कुलवधुचा परिचय उखाना घेउदन क रतात. पुजारी नववधुच्या ओटीत अशिर्वादाचा नारळ देतात. मंदिरा सभोवतीओटीचा नारळ व लग्नगाठीसह पाच मंदिर प्रदक्षिणा घालतात. यमाई देवीला पीठ मिठ अर्पण करून आमचा ही संसार पीठ मिठाने भरून जाउद दे म्हणुन देवीला साकडे घालतात. यमाई देवी मंदिराच्या पाठीमागे नववधुवर खापरांची उतरंड लावुन येथुन नवीन संसाराची सुरूवात करतात. श्री.यमाई देवीला पातळ खणा नारळाची ओटी भरतात. लग्नाचा गोंधळ व घुगुळ हा कुलाचार विधी ही जोतिबा मंदिरात नववधुवर करताना दिसत आहेत. काही भाविक जोतिबा देवाच्या दरबारात हा कुलाचार विधी पुर्ण करतात. कुलाचार विधीसाठी जोतिबा मंदिरात आता नवदापंत्यांची गर्दी वाढु लागली आहे. त्यांच्या समवेत करवली, वधुवर, मातापिता, पाहूणे यांचा लवाजमा मोठा असतो. (वार्ताहर)
जोतिबावर वावर ज़त्रांची धांदल
By admin | Published: May 05, 2017 10:16 PM