कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहत येथील सरोज कास्टिंगच्यावतीने सामाजिक बांधीलकी म्हणून महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस अत्याधुनिक हायड्रॉलिक लाकूड कटिंग मशीन दिले. परशुराम शंकरराव जाधव (बापू) आणि विजयमाला परशुराम जाधव यांच्या स्मरणार्थ अजित परशुराम जाधव यांनी हे मशीन गुरुवारी महापालिकेकडे सुपूर्द केले.
कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला वेगळे महत्त्व आहे. येथे महापालिकेकडून मोफत अंत्यसंस्कार केले जातात. येथील विविध विकासकामे लोकसहभागातून केली जातात. त्याला कोल्हापुरातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील धोकादायक वृक्ष तोडल्यानंतर तसेच फांद्याची छाटणी केल्यानंतर स्मशानभूमीकडे लाकडे जमा केले जाते. हे लाकूड कटिंग करण्यासाठी अडचणी होत्या. ठेकेदाराकडून कटिंग करून घेतले जात होते. सरोज कास्टिंगच्यावतीने कटींग मशिन दिल्यामुळे स्मशानभूमीला हातभार लागणार आहे. हे मशीन सुरेखा इंडस्ट्रीज उद्यमनगर कोल्हापूर यांनी बनवून दिले आहे. गुरुवारी स्मशानभूमीकडे मशिन सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, सुरेख इंडस्ट्रीजचे चेतन लोहार, स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.
चौक़ट
वर्षाला २० लाखांची होणार बचत
कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची आहे. कोरोनामुळे यामध्ये आणखीन भर पडली आहे. अशा स्थितीमध्ये खर्चावर बचत करणे महत्त्वाचे आहे. अंत्यसंस्काराची मोफत सेवा देणाऱ्या स्मशानभूमीला लाकूड कटिंगचे मशीन उपयोगी ठरणार आहे. ठेकेदाराकडून यापूर्वी लाकूड तोडून घेतली जात होती. आता मशीनमुळे स्मशानभूमीचा वर्षाला सुमारे २० लाखांची बचत होणार आहे.
चौकट
कटिंग मशीनची किमत : सुमारे ४ लाख
स्मशानभूमीला महिन्याला लागणारे लाकूड : ४० टन
कटींग मशीनमुळे वर्षाला होणारी बचत : २० लाख
फोटो : १४०१२०२१ कोल केएमसी स्मशानभूमी न्यूज
ओळी : सरोज कास्टिंग महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस अत्याधुनिक हायड्रॉलिक लाकूड कटिंग मशीन दिले. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, सुरेख इंडस्ट्रीजचे चेतन लोहार, स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.