सरवडे : आपण कोणासोबत आहे, हे सांगायचे आणि त्याबाबत खुलासा करण्याची गरज नाही, महायुतीचाच आपण घटक असल्याचे प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.बिद्री (ता. कागल) येथील विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मंडलिक म्हणाले, गेली अनेक वर्षे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ व मला आशीर्वाद देणारे बिद्री हे गाव आहे. महायुतीचे शासन आणि मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून कागल तालुक्यात प्रचंड विकासकाम झालेले झालेले आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक यांचे भाषण ऐकले पण, पराभवसुद्धा त्यांनी संयमाने घेतला आहे. हीच शिकवण सदाशिवराव मंडलिक यांनी आम्हाला दिली आहे. राजकारणात जनतेला गृहीत धरायचे नाही. जनतेला लाथा मारणे म्हणजे वाऱ्याला लाथा मारण्यासारखं आहे. त्यांनी फिरायला सुरू करावे. जनतेचे काम हाती घ्यावे, त्यांना उज्ज्वल भविष्य आहे.यावेळी आनंदराव फराकटे, तानाजी पाटील, पांडू पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, मसू पाटील, राजाराम चौगुले, शिवाजीराव पाटील, दिनकर कोतेकर, मनोज फराकटे, सरपंच पांडुरंग चौगुले, विलासराव पाटील, बी. एम. पाटील आदी उपस्थित होते.
ती वेळ आता आलेली आहे..मंडलिक म्हणाले, कागलमधील विकासकामांची पुस्तिका बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असे मंत्री मुश्रीफ नेहमी म्हणतात, खरं म्हणजे ती वेळ आता आलेली आहे. मीसुद्धा या पुस्तिकेची वाट बघत आहे. कदाचित; महाराष्ट्रात विक्रम झालाय की काय, ही उत्कंठा मला आहे.अजून ‘तो’ जन्माला यायचा आहेप्रा. मंडलिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे संदर्भ जनतेसमोर ठेवले. आपण कधीच जय-पराजय याचा विचार करीत नाही. माझ्या पाठीशी जनतेची एवढी ताकत असताना मला भीती वाटायची गरज नाही. बचेंगे तो और भी लढेंगे, आमचा आणि आमच्या विचारांचा पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे.