शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आई बनली लेखणी..‘ओंकार’ची यशाला गवसणी

By admin | Published: June 09, 2015 1:06 AM

यशकथा : ‘सेरेब्रल पाल्सी’ने आजारावर मात करत मिळविले सत्तर टक्के गुण

कोल्हापूर : ‘सेरेब्रल पाल्सी’ने आजारी असलेल्या येथील ओंकार मकरंद देशमुख याने आई अंजली यांच्या साथीने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळविले. पराकोटीचे अपंगत्व असतानाही ओंकारने जिद्दीने मिळविलेले यश छोट्या-छोट्या गोष्टींसाठी निराश होणाऱ्या सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.ओंकार हा ‘सेरेब्रल पाल्सी’ या विकाराने त्रस्त आहे. तो जे काही बोलतो, ते केवळ त्याच्या आई-वडिलांनाच समजते; त्यामुळे त्याने दहावीची परीक्षा द्यायची कशी, अशी अडचण निर्माण झाली होती. कारण त्याला स्वत:ला तरी लिहिता येत नाही व तो जे सांगतो ते इतरांना समजत नाही. आईला लेखनिक म्हणून देण्याची तरतूद नव्हती. मुलाने दहावीची परीक्षा द्यावी यासाठी पालक प्रयत्नशील होते. अखेरचा पर्याय म्हणून कुटुंबीयांनी ओंकारच्या लेखनिक (रायटर) म्हणून त्याच्या आर्इंना परवानगी द्यावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे शिक्षण मंडळाकडे केली. ओंकारची स्थिती लक्षात घेऊन, त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘विशेष बाब’ म्हणून राज्य शासनाने त्याची आई अंजली यांना परीक्षेत लेखनिक म्हणून परवानगी दिली. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ओंकारला दहावीची परीक्षा देता आली. या संधीचे सोने करण्याची किमया ओंकारने जिद्दीने केली. आपण परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याला झालेला आनंद शब्दांत मांडता येत नाही. त्याने या आनंदाप्रीत्यर्थ वाटलेल्या पेढ्यांनाही वेगळाच सुगंध होता. मुलाचे यश पाहून आईचेही डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. ओंकार हा ‘लोकमत’ कोल्हापूरचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांचा मुलगा आहे. त्याच्या यशात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा कोल्हापूर विभाग, कोल्हापुरातील दादासाहेब मगदूम हायस्कूल आणि औरंगाबादमधील महाराष्ट्र हिंदी विद्यालयाचे योगदान महत्त्वाचे ठरल्याची प्रतिक्रिया ओंकारच्या आई अंजली यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)