कागल : जगात दु:ख फार आहे ते वाटून घ्यायला शिकले पाहीजे. दु:ख भोगल्याशिवाय आयुष्यात सुखाची किंमत कळत नाही.म्हणून समाजातील दिन-दुबळे, अंपग, अंधांना मदत करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले.कागल येथील अनिता आणि संजय चितारी यांनी आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शहरातील २५ वर्षांपूर्वी अंतरजातीय विवाह करून यशस्वी संसार करीत असलेल्या २५ जोडप्यांचा सत्कार आणि सिंधुताईचे व्याख्यान, असा हा कार्यक्रम होता. येथील विजयादेवी घाटगे गार्डनमध्ये रंगलेल्या सोहळ्यात विविध मान्यवर, निंबाळकर -चितारी कुटुंबीय, नातेवाईक हजर होते. यावेळी जमा झालेल्या भेटवस्तू आणि रोख रक्कम असे ७० हजार रुपये सिंधुताईच्या फौंडेशनला प्रदान करण्यात आले.सिंधुताई सपकाळ पुढे म्हणाल्या की, प्रेमविवाह करून २५वर्षांहून जास्त काळ सुखाचा संसार करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करता आला. हा एक अगळा-वेगळा कार्यक्रम मला पाहता आला. संजय व अनितांच्या या उपक्रमाला दाद दिली पाहिजे. जीवनात प्रेमाला खूप महत्त्व आहे. प्रेम घ्यायला-द्यायला शिकले पाहीजे. संजय चितारी यांनी प्रास्तविक केले. यावेळी बसवराज - प्रेमाताई चितारी आणि वंसतराव - शंकुतला निंबाळकर यांच्या हस्ते सिंधुताईचा सत्कार करण्यात आला.
दु:खाशिवाय सुखाची किंमत कळत नाही
By admin | Published: February 26, 2017 12:50 AM