शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

‘मी पंचगंगा बोलते’ आता सोशल मीडियावर...

By admin | Published: December 14, 2015 12:20 AM

प्रदूषणाबाबत जनजागृती : जिल्हा परिषदेचा पुढाकार; नऊ मिनिटांची चित्रफीत

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर---पंचगंगा नदी प्रदूषणासंबंधी जाणीवजागृती सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांत करण्यासाठी ‘मी पंचगंगा बोलते’ या नावाने नऊ मिनिटांची चित्रफीत तयार करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. येथील मनोहरी चित्रनिर्मिती संस्थेने ही चित्रफीत बनविली आहे. जिल्हा परिषद प्रशासन या चित्रफितीचे प्रसारण करणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषणास विविध घटक जबाबदार आहेत. परिणामी प्रदूषित पाणी नळयोजनेद्वारे नदीकाठावरील गावांत पुरवठा झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक विभागाचे प्रशासन, जिल्हा परिषद यांनी यापूर्वी ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रत्येक सुनावणीत प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या त्याचा आढावा घेत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी समिती कार्यरत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी विशेष लक्ष घालून पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन गतिमान केले. गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती आणि निर्माल्य विसर्जनामुळे पंचगंगा नदीचे प्रचंड प्रदूषण होते. हे थांबविण्यासाठी सुभेदार यांनी यंदा चांगले नियोजन केले. भक्तांचे सहकार्य, प्रशासनाने केलेले आवाहन यामुळे मूर्ती आणि निर्माल्य दानला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. तब्बल सातशे ते आठशे ट्रॉली निर्माल्य आणि ५० हजारांवर दान मूर्ती एकत्र करून कुणाच्याही भावनेला धक्का न लावता खुल्या खणीत आणि पडीक विहिरीत मूर्ती विसर्जित केल्या. यशस्वी झालेल्या या उपक्रमाची दखल राज्यपातळीवर शासकीय यंत्रणेने घेतली. हा उपक्रम यशस्वी कसा केला, पंचगंगा आधी कशी होती, आता तिचे स्वरूप कसे आहे, प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेले अन्य विविध उपक्रम, लोकांचा सहभाग, प्रदूषण रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी काय करायला हवे, आदी प्रमुख विषयांवर चित्रफितीद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. राधानगरीपासून इचलकरंजी, शिरोळ तालुक्यापर्यंत नदीकाठावरील काढलेले लक्षवेधी फोटो आणि परिणामकारक संवाद, मूर्ती आणि निर्माल्य दानवेळी चित्रीकरणाचेकाही शॉटस्, पार्श्वसंगीत याचा समावेश चित्रफितीत आहे. मनोहरी चित्र निर्मिती संस्थेचे संकेत रणदिवे यांनी ही चित्रफीत तयार केली आहे. अलीकडे वाढलेल्या सोशल मीडियाचा वापर करून जागृतीसाठी आणि जिल्हा, राज्य पातळीवरील विविध आढावा बैठकीत सादरीकरणासाठी चित्रफितीचा वापर जिल्हा परिषद करणार आहे. वाढत्या प्रदूषणाबाबत ‘मी पंचगंगा बोलते’ या नावाने नऊ मिनिटांची चित्रफीत तयार केली आहे. जिल्हा परिषदेने ही चित्रफीत बनविण्याचे काम दिले होते. या चित्रफितीचे काम आता पूर्ण झाले असून, तिचे प्रसारण जिल्हा परिषद प्रशासन करणार आहे. - संकेत रणदिवे, निर्माता, मनोहरी चित्र निर्मिती संस्था