शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Kolhapur: महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 4:07 PM

‘के. पी.’ना हबकी डावाची सवय

आमजाई व्हरवडे : आगामी विधानसभा मी लढणार असून, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व व स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचा आशीर्वाद व शेकाप जनता दल उद्धव सेना यांची साथ माझ्यासोबत असल्याने महाविकास आघाडीची उमेदवारही मलाच मिळेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.‘राधानगरी’ मतदारसंघातील माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. आवळी बुद्रूक (ता.राधानगरी) येथे शनिवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.ए. वाय. पाटील म्हणाले, मी ३५ वर्षे राजकारण करत असताना सामाजिक कामच्या शिदोरीवरच कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आता विधानसभा लढण्याची मी तयारी केली असून, आता कोणत्याही परस्थितीत थांबणार नाही.यावेळी भोगावतीचे उपाध्यक्ष राजू कवडे, संचालक नंदूभाऊ पाटील, मानसिंग पाटील, दिनकर पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, आर. वाय. पाटील, अवि पाटील, मोहन पाटील, संदीप पाटील, महादेव कोथळकर, नेताजी पाटील, प्रकाश मोहिते, अमर पाटील, अशोक पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, विलास हळदे आदी उपस्थित होते.‘के. पी.’ना हबकी डावाची सवयमहाविकास आघाडीची उमेदवारी आपणालाच मिळणार, अशा वावड्या काही मंडळी उठवत आहेत. पण त्यांना हबकी डावाची जुनी सवय असल्याचा टोला ए. वाय. पाटील यांनी ‘के. पीं’चे नाव न घेता हाणला.इतर निवडणुकांनाही हातात ‘हात’केवळ विधानसभा निवडणुकीसाठी नव्हे तर आगामी सर्वच निवडणूका काँग्रेस, शेकाप, उद्धवसेना, जनता दल व आम्ही हातात हात घालून लढणार असल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणA. Y Patilए. वाय. पाटीलvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी