दत्तवाड : गोकूळमध्ये मिळालेल्या संचालकपदाचा वापर सर्वसामान्य दूध उत्पादक सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार आहे. सर्वसामान्य शिवसैनिकापासून ते जिल्हाप्रमुखपदापर्यंंत प्रवास निष्ठेने केल्यामुळे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर ही जबाबदारी टाकली आहे. दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडीन, असे प्रतिपादन गोकूळचे शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव यांनी केले.
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी. एस. पाटील होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार तसेच शहीद जवान स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय खोत, अण्णासो बिलोरे, रमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील यांनी केले.
कार्यक्रमास वैभव उगळे, साताप्पा भवान, युवराज घोरपडे, अमित कदम, बाबासाहेब सावगावे, सुदर्शन भोसले, उमेश पाटील, राजेश पाटील, नीलेश तवंदकर, रणजित पाटील, पांडुरंग पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मंगेश पाटील यांनी आभार मानले.