कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ४४ कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेच्या परिवहन विभागाकडील (के.एम.टी.) १०४ नव्या बसेसपैकी प्रोटोटाईप (मॉडेल) बस आज, सोमवारी कोल्हापुरातील शास्त्रीनगर कार्यशाळेत दाखल झाली. अत्याधुनिक पद्धतीची असलेली ही नवीन प्रोटोटाईप बस प्रवाशांचा प्रवास आरामदायी व सुखदायी प्रवास करणारी ठरेल. दर महिन्याला २५ अशा एकूण तीन महिन्यांत ७५ बसेस टप्प्या-टप्प्यांनी कोल्हापुरातील रस्त्यांवर फिरणार आहेत. दरम्यान, आज दाखल झालेली प्रोटोटाईप बसची पाहणी के.एम.टी. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केली.महापालिकेच्या परिवहन विभागाकडील (के.एम.टी.)ला गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारकडून बस खरेदी, प्रशस्त वर्कशॉप व जीपीएस तंत्रज्ञान, आदींसाठी ४४ कोटींचा निधी मिळाला. दरम्यान, केंद्रीय पथकाकडून अशोक लेलँड कंपनीच्या बेळगाव येथील वर्कशॉपमध्ये या बसची चाचणी झाली आहे. नवी दिल्ली येथील ड्रायव्हिंग अॅन्ड डिझायनिंग स्पेसिफिकेशन आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनच्या पथकाकडून तिची पाहणी झाली असल्याचे आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात ही के.एम.टी.ची नवीन बस आली आहे. (प्रतिनिधी)पूर्वीच्या बसवर एक नजररोज शहर व उपनगरांत सुमारे २४.५० रूंदी, आताची (नवीन) २३.३५ असणारप्रतिलिटर डिझेलला साडेतीन ते पावणेचार किलोमीटर धावत होती४० आसन क्षमताप्रोटोटाईपची वैशिष्ट्येदोन पायऱ्या; अत्याधुनिक पद्धतीचे एलर्ईडीचे बल्ब, ३४ आसन क्षमताइच्छितस्थळी वेळेत पोहोचल्याची वेळ जीपीएसमुळे समजणारबसमध्ये अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा व बसच्या पाठीमागील बाजूस कॅमेराप्रतिलिटर डिझेलला पाच किलोमीटर धावणारबसच्या दोन्ही बाजूला अॅटोमॅटिक पद्धतीचे ‘डोअर’प्रोटोटाईप बसचे पासिंग करणार आहे. त्याच्या उद्घाटन समारंभानंतर ही नवीन बस दोन-तीन दिवसांत प्रवाशांना सेवा देईल.-संजय भोसले, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक,के.एम.टी.
वाट पाहीन पण ‘के.एम.टी.’नेच जाईन
By admin | Published: February 03, 2015 12:40 AM