आज प्राप्त अहवालात यशवंत कॉलनी ४, जवाहरनगर ३, खंजिरे मळा, रिंगरोड-मंगळवारपेठ, वेताळपेठ, आसरानगर,गोंदकर मळा, नेहरूनगर, गोकुळ चौक, यशोलक्ष्मीनगर, गणेशनगर या भागातील प्रत्येकी २ तसेच आंबी गल्ली, गावभाग, श्रीपादनगर, आमराई मळा, मोठे तळे, टिळक रोड, शाहू कॉर्नर, चांदणी चौक, सांगली रोड, शांतीनगर, आरगे मळा, जाधव मळा, सहकारनगर, वर्धमान चौक, राधाकृष्ण चौक, आवाडेनगर, तांबे माळ, योगायोगनगर, गोसावी गल्ली, राजाराम मैदानाजवळ, तीनबत्ती चौक, विवेकानंद कॉलनी, पुजारी मळा, भोने माळ, भारतमाता हौसिंग सोसायटी व दत्तनगर आदी भागातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आजतागायत एकूण बाधितांची संख्या ७ हजार २१ वर पोहचली आहे. मृत्यूसंख्या ३५४ झाली असून उपचार घेणाऱ्यांची संख्या ५०० आहे. एकूण ६ हजार १६९ जण बरे झाले आहेत.
इचलकरंजीत ५१ पॉझिटिव्ह ; २ तरुणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:18 AM