इचलकरंजी : शहरात विविध २८ भागांतील ५४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच उपचारांदरम्यान शहापूर येथील पाटील गल्ली परिसरातील ६० वर्षीय वृद्धा व टाकवडे वेस परिसरातील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये वर्धमान चौक परिसर ५, जवाहरनगर ४, दत्तनगर, विक्रमनगर, यशवंत कॉलनी, सांगली नाका, गोकुळ चौक प्रत्येकी ३, बावणे गल्ली, चंदूर रोड, गणेशनगर, महेश कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, टाकवडे वेस, कोल्हापूर नाका, नाकोडानगर प्रत्येकी २, श्रीपादनगर, अवधूत आखाडा, मधुबन हौसिंग सोसायटी, लंगोटे मळा, डंबाळ गल्ली, प्रियदर्शनी कॉलनी, गांधी कॅम्प, साईनगर, विकासनगर, तांबे मळा, शेळके गल्ली येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार ४२१ जणांना लागण झाली असून, पाच हजार ६८० जण बरे झाले आहेत. ४२४ जणांवर उपचार सुरू असून, मृत्युसंख्या ३१७ वर पोहोचली आहे.