इचलकरंजी : उत्तम-प्रकाश चित्रमंदिर ते नवीन वैरण बाजार, शेळके मळा, लक्ष्मी मंदिर ते नदीवेस नाका येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्याचा प्रारंभ पै.अमृत भोसले यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी नगरसेवक रवींद्र लोहार, बाळासाहेब कलागते, विजय जाधव यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते. हा रस्ता माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नांतून झाला आहे.
बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन
इचलकरंजी : रोटरी क्लबतर्फे शहर मर्यादित बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन केले होते. रोटरीचे अध्यक्ष अभय यळरूटे यांनी फीत कापून उद्घाटन केले. स्पर्धेमध्ये इचलकरंजीसह निपाणी येथील स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी दीपक निंगुडगेकर, डॉ. रमेश जठार, रवींद्र नाकील, महेश दाते, आदी उपस्थित होते.
रविवारी एकांकिका स्पर्धा
इचलकरंजी : राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा रविवार(दि.२७)पासून सुरू होणार आहेत. यादिवशी दुपारी एक वाजता नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. मनोरंजन मंडळ व श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या स्पर्धा होणार आहेत.