इचलकरंजी : मुंबई येथे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा झाल्या. त्यामध्ये येथील मराठी मीडियम हायस्कूलची संचिता साखरे हिने लेखी व प्रात्यक्षिक अशा दोन टप्प्यांत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. स्पर्धेसाठी ४६ विद्यार्थी बसले होते. संचिता हिला मानद सचिव सपना आवाडे, मुख्याध्यापक एन. एच. गाडेकर, एन. एस. खोत, एस. एस. साखरे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
०८०४२०२१-आयसीएच-०१ - संचिता साखरे
वसंत व्याख्यानमाला रद्द
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपटे वाचन मंदिराची २ ते ९ मे या कालावधीत होणारी वसंत व्याख्यानमाला रद्द करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाणारे वाचन संस्कार शिबिरही रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले.
स्नेहा खारपांदे हिचे यश
इचलकरंजी : डेरवण (जि. रत्नागिरी) येथे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत येथील जवाहरनगर हायस्कूलची खेळाडू स्नेहा सुकुमार खारपांदे हिने उंच उडी खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला. तिला मुख्याध्यापिका के. यु. पोतदार, क्रीडाशिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले.
अभियानाचा सांगता समारंभ
इचलकरंजी : रोटरी क्लबच्यावतीने ‘माय आत्मनिर्भर बेटी अभियान’ हा ६० दिवसांचा उपक्रम झाला. या अभियानाचा सांगता समारंभ रोटरी सेवा केंद्रात झाला. यावेळी निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक रूपाली पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अभय यळरुटे, सचिन दीपक निंगुडगेकर, शामसुंदर मर्दा, लक्ष्मीकांत तोष्णीवाल, मेघा यळरुटे, आदी उपस्थित होते.