इचलकरंजी : पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी करवीर कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी या योजनेची १५ दिवसांत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. आंदोलनात हणमंत लोहार, मारुती आजगेकर, महेश लोहार, शिवाजी जाधव, शशिकांत सदलगे आदी सहभागी झाले होते.
--
ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा
इचलकरंजी : डीकेटीई इचलकरंजी हायस्कूलमध्ये ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्रवीण झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी पारितोषिक वाटप केले. यावेळी मुख्याध्यापिका व्ही. एच. उपाध्ये, आर. ए. पाटील, व्ही. डी. कासार, शेखर दरिबे आदी उपस्थित होते.
--
ऑनलाईन गणित कार्यक्रम
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम झाला. सुरूवातीला प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढोकळे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात गणित विषयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. जे. मुंगारे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास प्रा. एस. पी. थोरात, प्रा. डॉ. पी. पी. पुजारी, प्रा. सुप्रिया पाटील आदी उपस्थित होते.
--
रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन
इचलकरंजी : येथील पालिकेच्यावतीने देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, केतन गुजर, शीतल पाटील आदी उपस्थित होते.