इचलकरंजी : हेरवाड (ता. शिरोळ) येथे संस्कार वाचन कट्ट्याचे उद्घाटन पं. स. सदस्या मिनाज जमादार यांनी केले. या वेळी पोलीस पाटील रेखा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर व बी. बी. गुरव यांनी पुस्तके भेट दिली. सुजाता गुरव यांनी आभार मानले.
शाळेमध्ये वृक्षारोपण
शहापूर : येथील माजी बांधकाम सभापती शोभा शीतल कांबळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. बळीराम हेडगेवार या शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी रवी कांबळे, राजाराम कांबळे, सुभाष डावरे, अमोल भाटले, प्रकाश कांबळे, गुड्डू शेख आदी उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी मंडळाचा पदग्रहण समारंभ
इचलकरंजी : इनरव्हिल क्लबच्या नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी स्मिताताई शिरगावकर (उगार खुर्द) यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. स्नेहा मराठे यांनी इनरव्हिल प्रेअरचे वाचन केले. कार्यक्रमास सुभाष तंगडी, मुकेश जैन, मिलिंद बिरादार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन केतकी मेहता यांनी केले. मुग्धा शहा यांनी आभार मानले.
ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये ‘जनसंचार माध्यम और हिंदी’ या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. डी. नारे होते. प्रा. विरुपाक्ष खानाज यांनी महाविद्यालयाची भूमिका विषद केली. कार्यशाळेत प्रा. सुधाकर इंडी व प्रा. डॉ. विजय गाडे यांनी हिंदी या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. माधव मुंडकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. साईनाथ चपळे यांनी केले. या वेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
आशा वर्कर्स यांचा सत्कार
इचलकरंजी : लायन्स क्लबच्यावतीने आशा वर्कर्स यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभामुळे आम्हास आणखीन जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे मत गटप्रवर्तक नंदिनी करडे यांनी व्यक्त केले. या वेळी लक्ष्मीकांत भट्टड, शैलेंद्र जैन, महेंद्र बालर, महेश सारडा, विजय राठी आदी उपस्थित होते.