इचलकरंजी : व्यंकटराव हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. यावेळी लायन्स ब्लड बॅँकेचे अध्यक्ष विजयकुमार राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. एसएससी व एचएससी गुणवंत विद्यार्थी व विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. मुख्याध्यापक ए. ए. खोत यांनी स्वागत केले. यावेळी गो. सि. ढवळे, कौशिक मराठे, जी. एस. इंगळे यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन जी. टी. कांबळे यांनी केले. एम. एम. म्हाकाळे यांनी आभार मानले.
हळदी-कुंकू व स्नेहमेळावा उत्साहात
इचलकरंजी : हिंदू खाटीक समाजाच्यावतीने आयोजित महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व स्नेहमेळावा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी सहकारी संस्था अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे होते. यावेळी डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध फनी गेम्ससह प्रश्नमंजूषा व इतर स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रमास नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सभापती उदयसिंह पाटील, चंद्रकांत इंगवले, दिलीप भोपळे, सिदराम शेटके, अशोक कांबळे, आदी उपस्थित होते. सुनील ताडे यांनी आभार मानले.
आदित्य गवळीचा विक्रम
इचलकरंजी : येथील आदर्श विद्यामंदिरचा विद्यार्थी आदित्य गवळी याने सतत पाच तास स्केटिंग करून विक्रम केला. या यशाबद्दल त्याचा अध्यक्ष सदाशिव लोकरे, डी. एम. बिरादार, गोवर्धन बोहरा, मुख्याध्यापिका गीता खोचरे यांनी सत्कार केला.
वाचन पंधरवडा कार्यक्रम उत्साहात
इचलकरंजी : सरस्वती हायस्कूलमध्ये वाचन पंधरवडा कार्यक्रम उत्साहात झाला. सुरुवातीला मान्यवरांनी ग्रंथांना फुले वाहिली. अशोक दास व अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापक पी. डी. शिंदे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास आर. एन. जाधव, एस. व्ही. पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. महावीर कांबळे यांनी आभार मानले.
धनगर समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात
इचलकरंजी : धनगर समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा उत्साहात झाला. मेळाव्याचे उद्घाटन उत्तम आवाडे यांनी केले. आमदार प्रकाश आवाडे यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव केला. शंकर पुजारी यांनी स्वागत केले. कार्यक्रमास सभापती विठ्ठल चोपडे, सुनीता शेळके, नागेश पुजारी, प्रकाश पुजारी, सचिन हेरवाडे, अरविंद पुजारी, आदींसह समाजातील वधू-वर पालक उपस्थित होते. राजू पुजारी यांनी आभार मानले.