इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे केअर हॉस्पिटलमध्ये कोविड १९ व्हॅक्सिन लस देण्यास सुरूवात झाली. यावेळी नगरसेवक मदन कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप पाटील, डॉ. शुभांगी पाटील, मनोहर माने, दत्तात्रय माने, त्रिवेणी कोळी यांच्यासह सर्व डॉक्टर उपस्थित होते.
मोफत नेत्र तपासणी शिबिर
इचलकरंजी : येथील महेश क्लब आणि नॅब नेत्र रुग्णालय (मिरज) च्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर शनिवारी (दि. १३) महेश क्लब येथे सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत होईल. शिबिरात नामवंत नेत्रतज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाणार आहे. तरी इच्छुक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संजय रेंदाळकर सुवर्णपदक ०९०३२०२१-आयसीएच-०१ - संजय रेंदाळकर
इचलकरंजी : पत्रकारिता आणि जनसंवाद पदवीत महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल संजय रेंदाळकर यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीच्या वेबिनारमध्ये सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. रेंदाळकर हे नाईट कॉलेज आर्टस् ॲण्ड कॉमर्स इचलकरंजीचे विद्यार्थी आहेत. सध्या ते मालती माने विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अमरसिंह माने, शिवाजी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.