पुण्यातील नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील खुनी हल्ला आणि अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला यांच्यातील ‘मोडस आॅपरेटी’मध्ये बरेच साम्य असल्याने पानसरे यांच्या हल्ल्याचे कनेक्शन इचलकरंजीपर्यंत असावे, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पोलिसांचा सर्व फोकस हा इचलकरंजीतील गुन्हेगारी टोळ्यांवर राहिला आहे. या टोळ्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून पोलीस चौकशी करीत आहेत. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यातील साम्य मिळते-जुळते आहे. दाभोलकर सकाळी फिरायला गेले होते, त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता. गोविंद पानसरेही फिरायला गेले असता, त्यांना टार्गेट करण्यात आले. दोघांवर हल्ले करणारे हल्लेखोर हे दोघे होते आणि मोटारसायकलवरून आले होते. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी असते. अशावेळी पाळत ठेवून हल्ला करणे सोपे जाते व त्यानंतर आरामात पळूनही जाता येते, याचा अंदाज बांधून हल्लेखोरांनी योजना आखली आहे. पुण्यातील नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील खुनी हल्ला आणि अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला यांच्यातील ‘मोडस आॅपरेटी’मध्ये बरेच साम्य असल्याने पानसरे यांच्या हल्ल्याचे कनेक्शन इचलकरंजीपर्यंत असावे, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पोलिसांचा सर्व फोकस हा इचलकरंजीतील गुन्हेगारी टोळ्यांवर राहिला आहे. या टोळ्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून पोलीस चौकशी करीत आहेत. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यातील साम्य मिळते-जुळते आहे. दाभोलकर सकाळी फिरायला गेले होते, त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता. गोविंद पानसरेही फिरायला गेले असता, त्यांना टार्गेट करण्यात आले. दोघांवर हल्ले करणारे हल्लेखोर हे दोघे होते आणि मोटारसायकलवरून आले होते. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी असते. अशावेळी पाळत ठेवून हल्ला करणे सोपे जाते व त्यानंतर आरामात पळूनही जाता येते, याचा अंदाज बांधून हल्लेखोरांनी योजना आखली आहे.
इचलकरंजी कनेक्शन पोलिसांचा अंदाज
By admin | Published: February 16, 2015 11:18 PM