शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

इचलकरंजीत पक्षप्रमुखांच्या

By admin | Published: November 02, 2016 12:42 AM

भाजप विरुद्ध काँग्रेस लढत : ४० टक्के विद्यमानांना वगळले

राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चाललेली खलबत्ते आणि नाराजीतून बंडखोरी होऊ नये म्हणून घेण्यात येणारी दक्षता, अशी तारेवरची कसरत शहरातील सर्व पक्ष व आघाड्यांच्या प्रमुखांना करावी लागली. या निवडणुकीत विद्यमान सभागृहाचे ४० टक्के नगरसेवक वगळले गेले. भाजप विरुद्ध कॉँग्रेस अशीच पक्षनेतृत्वाची कसोटी घेणारी ही निवडणूक आहे. पालिका निवडणुकीमध्ये प्रथमच भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर नगरसेवकच्या काही जागा व नगराध्यक्षपद लढविले जाणार असल्यामुळे यापूर्वीचे नगरपालिका निवडणुकीतील संकेत बदलले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील कारंडे गटाची गोची झाल्यामुळे त्यांनी कॉँग्रेससोबत राहण्याचे पसंत केले; मात्र पक्षांतर्गत जांभळे गटाशी असलेले त्यांचे शत्रुत्व यावेळी उफाळून आले. म्हणून कारंडे गटाला शाहू आघाडी अशी स्वतंत्र गटाची स्थापना करावी लागली. याचा परिणाम म्हणून कॉँग्रेस, जांभळे व कारंडे गटामध्ये जागा वाटपावरून खलबत्ते झाली. यातून कॉँग्रेसने ३९ जागी आपले उमेदवार उभे केले. तर जांभळे गटाला आठ आणि कारंडे गटाला पंधरा जागा मिळाल्या. आमदार सुरेश हाळवणकर यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजप ३१ व शहर विकास आघाडी ३१ अशा जागा लढविल्या जातील, असे घोषित केले होते. पुढे मात्र शहर विकास आघाडी आणि मॅँचेस्टर आघाडी असा समझोता झाला आणि निवडणूक चिन्हाची अडचण असल्यामुळे या दोन्ही आघाड्यांनी ताराराणी आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढविण्याचे ठरले. त्यांच्यामध्येसुद्धा भाजप ३९ व ताराराणी आघाडी २३ असे जागा वाटप झाले. इचलकरंजीतील नगराध्यक्षपदासाठी २ लाख १५ हजार इतके मतदार असल्यामुळे ही निवडणूक एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीसारखी लढली जाणार, असा राजकीय व्होरा आहे. अशा स्थितीत नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार आणि त्याच्याविरुद्ध कॉँग्रेसचा उमेदवार असे सूत्र स्वीकारण्यात आल्यामुळे ही निवडणूक भाजपविरुद्ध कॉँग्रेस अशी होणार, असे निश्चित झाले होते. त्यामुळे पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीकडे पुढील विधानसभेची रंगीत तालीम असेच पाहिले जात आहे. अशा स्थितीत मात्र दोन्ही बाजूंकडून उमेदवारांची ‘इलेक्शन मेरीट’वर छाननी करताना सध्याच्या सुमारे ४० टक्के नगरसेवकांना वगळले आहे. वगळण्यात आलेले नगरसेवक वगळण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये रत्नमाला भागवत, पारुबाई चव्हाण, हेमलता आरगे, भक्ती बोंगार्डे, मीना बेडगे, सुजाता बोंगाळे, रेखा रजपुते, प्रमिला जावळे, आक्काताई आवळे, सुमन पोवार, सुप्रिया गोंदकर, आक्काताई कोटगी, छाया पाटील, बिस्मिल्ला मुजावर या नगरसेविकांचा, तर बाळासाहेब कलागते, भीमराव अतिग्रे, संभाजीराव काटकर, शशांक बावचकर, मदन झोरे, महेश ठोके, रवींद्र माने, रणजित जाधव, चंद्रकांत शेळके, अजित जाधव या नगरसेवकांचा समावेश आहे. काही नगरसेवकांच्या नातेवाइकांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.