इचलकरंजी : येथील राजस्थानी युवक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली ‘कावड यात्रा’ भक्तिमय वातावरणात पार पडली. ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नम: शिवाय’ चा गजर करीत कावडधारक इचलकरंजीतून रामलिंगला रवाना झाले.महाराष्ट्रीयन श्रावण महिन्याच्या पंधरा दिवस आधी राजस्थानी व इतर भारतीय लोकांचा श्रावण महिना सुरू होतो. दुसऱ्या सोमवारी राजस्थानी बांधव कावड यात्रा काढतात. यामध्ये येथील राजस्थानी युवक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेचा प्रारंभ सकाळी आठ वाजता कापड मार्केटमधून करण्यात आला. कावडधारक तेथून राधाकृष्ण चौक, एमएसईबी चौक, डेक्कन रोडने कोरोची, हातकणंगले मार्गाने रामलिंग डोंगरावर पोहोचले. त्याठिकाणी असलेल्या शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.यावेळी राजाराम भुतडा, महेश त्रिपाठी, रामनिवास मुंदडा, ओमप्रकाश छापरवाल, प्रमोद पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष गोपी किशन काबरा, कमलकिशोर खंडेलवाल यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, मर्दा ग्रुप, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संगठन, एम.एम.स्पोर्टस्, मारवाडी युवा मंच, महेश स्पोर्टस्, मिडटाऊन, आदी मंडळांनी कावड यात्रेसाठी मार्गावर जलपानाची सोय केली होती. तसेच जगदंबा सत्संग मंडळाच्यावतीने भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत कावड यात्रा उत्साहात
By admin | Published: July 24, 2014 10:54 PM