दत्ता बिडकर ।हातकणंगले : हातकणंगले ते इचलकरंजी आठ किलोमीटर रेल्वे मार्गाला शेतकरी, कारखानदार आणि नागरी वस्तीमधून रेल्वे जाणार असल्याने बाधित मिळकतदारांचा विरोध आहे. रेल्वे प्रशासनाकडून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक असे दोन सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच तिसरा सर्व्हे करण्याचा नियम आहे. मात्र थेट तिसरा सर्व्हे करून चार गावांतील ऊस शेतीसह सर्व व्यवसायावर घाला घालण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे रल्वे प्रशासनाविरोधात या परिसरामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करून वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे रेल्वे प्रशासन विरुद्ध शेतकरी असा उद्रेक अटळ बनला आहे.इचलकरंजी शहराला रेल्वेने जोडण्याचा काम ‘अच्छे दिनवाले’ सरकार करत आहे. मात्र, यामुळे हातकणंगले, कोरोची, कबनूर आणि चंदूर या चार गावांतील शेतकºयांच्या जवळपास सातशे ते आठशे एकर ऊसपट्ट्यातील शेतीवर गंडांतर येणार आहे. या रेल्वे मार्गामुळे शेतकºयाच्या शेतीचे तुकडे पडणार आहेत. ऊस वाहतुकीपासून ते शेतीच्या मशागतीसाठी शेतकºयांना दोन-दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.
हातकणंगले, कोरोची, कबनूर आणि चंदूर या चार गावांमध्ये शेतकºयांनी शेती बागायत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पंचगंगा नदीवरून चार-सहा किलोमीटरच्या वैयक्तिक पाणी उपसा योजना आणलेल्या आहेत. तर या चार गावांमध्ये सहकारी तत्त्वावर तर पंचगंगा साखर कारखान्यानेही पाणी उपसा योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळेच आज या चार गावांमध्ये ऊस पिकाचे शंभर टक्के क्षेत्र निर्माण झाले आहे. शेतकºयांची आर्थिक घडी बसली असून या गावांची
आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती ऊसशेतीवर अलंबूनआहे. मात्र या ऊसपट्ट्यावरच रेल्वेमार्गामुळे घाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हातकणंगले-इचलकरंंजी रेल्वे मार्गाला लक्ष्मी औद्योगीक वसहात, के.पी.टी औद्योगिक वसाहत, हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरातील छोटे-मोठे उद्योग, कारखानदार यांनी विरोध केलेला आहे. औद्योगिक वसाहतीमधील काही छोट्या-मोठ्या उद्योगांवर या मार्गामुळे गंडातर येणार असल्यामुळे या उद्योग क्षेत्रानीही या रेल्वे मार्गाला विरोध केला आहे.थेट तिसरा सर्व्हेकोणत्याही रेल्वे मार्गाचा सर्व्हे करताना रेल्वे प्रशासन पहिल्यांदा या मार्गावरील मालवाहतूक किती आहे यांचा अभ्यास करते. त्यानंतर दुसरा सर्व्हे या मार्गावरील प्रवासी वाहतूक किती याचा अभ्यास करते आणि त्यानंतर मुख्य मार्गाचा सर्व्हे करून रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करते. मात्र, हातकणंगले-इचलकरंजी मार्गाबाबत मात्र पहिले दोन सर्व्हे रद्द करून थेट तिसरा सर्व्हे राजकीय दबावाखाली करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.चार गावांतील हजारो कुटुंबे होणार बेघरहातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्ग हातकणंगले, कोरोची, कबनूर , चंदूर आणि इचलकरंजी उपनगरांतील नागरी वसाहतीमधून जाणार असल्यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. या चार गावांतील ग्रामसभेने या रेल्वे मार्गाला विरोध करून तसे ठराव जिल्हा प्रशासनाला पाठवले आहेत. चार गावांतील मिळकतदारांनी औद्योगिक, निवासी आणि व्यापारी एनए करून आपली घरे आणि उद्योग सुरू केलेल्या सर्वसामान्यांवर कुºहाड कोसळणार आहे. या रेल्वे मार्गाचे अंतर आठ किलोमीटर आहे. यातील अंतर सात किलोमीटरचे अंतर चार गावांतील असून एक किलोमीटर अंतर उपनगर भागातून जाणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसताना रेल्वे प्रशासनाचा अट्टाहास का असा प्रश्न या गावांतील सर्वसामान्यांना पडला आहे.पोलीस बळाचा वापर करून शेतकºयांना वेठीस धरण्याच्या प्रकाराविरूद्ध तीव्र संताप८00 एकरशेतीवर घालाचार गावांचा विरोधरेल्वे प्रशासनाकडून माल, प्रवासी वाहतूक सर्व्हे न होता थेट तिसरा सर्व्हे
पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याच्या प्रकाराविरूद्ध तीव्र संताप ८00 एकर शेतीवर घाला चार गावांचा विरोध रेल्वे प्रशासनाकडून माल, प्रवासी वाहतूक सर्व्हे न होता थेट तिसरा सव्हे