अतुल आंबी इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघामध्ये सुरुवातीपासून सर्वच फेरीत महायुती भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी आघाडी घेतली आहे. 13 व्या फेरी अखेर त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यापेक्षा 35612 मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, नव्यव्या फेरीत केंद्र क्रमांक 121 चे ईव्हीएम मशीन बंद पडले. तसेच 13 व्या फेरीत केंद्र क्रमांक 175 मधील दोन पैकी एक मशीन बंद पडले. त्यामुळे दोन्ही मशीनची मोजणी शेवटी ठेवली आहे. कोरोची, तारदाळ, खोतवाडी, कबनूर, चंदूर या ग्रामीण भागामध्ये आघाडी घेतल्यानंतर शहापूर भागामध्येही आवाडे यांनी आपला करिष्मा कायम ठेवला. त्यानंतर शहरातील मतमोजणी मध्येही ते आघाडीवरच राहिले. बंडखोर उमेदवार विठ्ठल चोपडे यांना चार अंकी आकडाही गाठता आलेला नाही. 13 व्या फेरी अखेर त्यांना 1893 मते मिळाली आहेत. नव्या फेरीमध्ये दहा नंबर टेबल वरील ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने त्याची मोजणी शेवटी ठेवली आहे. त्यामधील चिट्टी वरील मते मोजली जाणार आहेत. तर केंद्र क्रमांक 175 मधील एक मशीन बंद पडल्याने त्याची मोजणी शेवटी केली जाणार आहे.
Ichalkaranji vidhan sabha assembly election result 2024: इचलकरंजीत दोन ईव्हीएम बंद पडले, राहुल आवाडे ३५६१२ मताने आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:49 PM