इचलकरंजी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शहरात दररोज वाढत असतानाही नागरिकांना अद्याप त्याचे गांभीर्य नाही. शुक्रवारी आठवडी बाजार व अन्य ठिकाणी गर्दी होती. संचारबंदी असतानाही विविध कारणे सांगून नागरिक फिरताना आढळत आहेत. कारवाई सुरू असली तरी त्याचा फरक दिसत नाही. त्याचबरोबर प्रशासनाकडूनही अद्याप म्हणावी तशी कडक भूमिका घेतली जात नाही.
शहरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. नियमित ठिकाणी आठवडी बाजार भरणार नाही. तसेच शहरातील विविध अठरा ठिकाणी आठवडी बाजार भरविला जाईल, असा निर्णय सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला असला तरी शुक्रवारी वडगाव बाजार कृषी समिती, थोरात चौक व विकली मार्केटच्या बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. काही ठिकाणी नागरिकांनी नियमांचे पालन करीत खरेदी केली.
१६०४२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजीत मोजक्या काही ठिकाणी बाजारात नियमांचे पालन करण्यात आले.
१६०४२०२१-आयसीएच-०६
शहरातील आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.
सर्व छाया : उत्तम पाटील