शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

सीए फाउंडेशन परीक्षेत इचलकरंजीची निधी ललवाणी देशात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:27 AM

कोल्हापूर : नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या चार्टर्ड अकौंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल दि. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ ...

कोल्हापूर : नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या चार्टर्ड अकौंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल दि. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय)तर्फे सोमवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात इचलकरंजी (कोल्हापूर) येथील सर्वोदयनगरमध्ये राहणाऱ्या निधी दिनेशकुमार ललवाणी हिने देशात पहिला क्रमांक पटकावला. ४०० पैकी ३६१ गुणांची कमाई करीत निधीने हे यश मिळविले आहे.

इंटरमेडियेट परीक्षेत कोल्हापूर विभागातून प्रतिभानगर येथील सिद्धांत संतोष मेहता याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ८०० पैकी ५६५ गुण मिळविले. शाहूपुरीतील हर्षिल समकीत शाह याने ४९२ गुणांसह दुसरा, तर जिव्हाळा कॉलनी (लक्षतीर्थ वसाहत) कल्पेश बाळू पाटील याने ४६८ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. गंगावेश येथील श्रेयस चेतन दळवी आणि टिंबर मार्केट परिसरातील सागर महेंद्र पटेल यांनी चौथा क्रमांक मिळविला. त्यांनी प्रत्येकी ४६१ गुणांची कमाई केली. ‘आयसीएआय’कडून वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये फाउंऊंडेशन, इंटरमेडियेट परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातून ५०० विद्यार्थ्यांनी फाउंडेशनची, तर ४२० विद्यार्थ्यांनी इंटरमेडियेट परीक्षा दिली. त्यातील फाउंडेशन परीक्षेत निधी हिने देशात अ‌व्वलस्थान पटकावले. तिने देशातील ७८ हजार विद्यार्थ्यांमधून हे यश मिळविले. ती मूळची राजस्थान येथील आहे. तिच्या वडिलांचा इचलकरंजीमध्ये कापड व्यवसाय असून, आई विमला गृहिणी आहेत. ती सध्या पुण्यातील चॉईस कॉलेजमधून बी. कॉम. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. दहावीमध्ये ९७ टक्के, तर बारावीमध्ये ९६.९६ टक्के गुणांसह ती उत्तीर्ण झाली होती. सीए फाउंडेशन अभ्यासक्रमाची तयारी तिने इचलकरंजीतील डीकेटीई इन्स्टिट्यूट आणि आयसीएआयच्या माध्यमातून केली. सिद्धांत मेहता हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या वडिलांचा पुस्तक विक्रीचा व्यवसाय असून, आई सोनाली या गृहिणी आहेत. भाऊ यश हा एमबीएचे शिक्षण घेत आहे. सिद्धांत याला दहावीत ९२.४ टक्के, तर बारावीला ८९.९० टक्के गुण मिळाले होते. सध्या पुण्यातील एस. पी. कॉलेजमधून तो बी. कॉम. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना ‘आयसीएआय’ कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए अनिल चिकोडी, उपाध्यक्ष तुषार अंतुरकर, सचिव सुशांत गुंडाळे, खजिनदार चेतन ओसवाल आदींचे मार्गदर्शन लाभले.